महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UP MLC Election result : प्रयागराजमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. के.पी. श्रीवास्तव यांचा विजय, पाहा विजयी उमेदवारांची यादी - mlc election up

उत्तर प्रदेशच्या विधानपरिषद निवडणुकीचे निकाल ( mlc election up 2022 result ) जाहीर झाले आहेत. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

UP MLC Election result
UP MLC Election result

By

Published : Apr 12, 2022, 4:26 PM IST

लखनौ- उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल ( UP MLC Election Live ) लागले आहेत. उन्नावमधून भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. लखनऊ उन्नाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रामचंद्र प्रधान यांना ३४८७ मते मिळाली आहेत. भाजपच्या उमेदवाराने समाजवादी पक्षाचे उमेदावर सुनील साजन यांचा पराभव केला आहे. त्यांना केवळ 3976 मते पडली.

अमेठीमधून भाजपचे उमेदवार शैलेंद्र प्रताप सिंह विजयी-सुलतानपूर विधानपरिषदेच्या जागेसाठी निवडणुकीची मतमोजणी ( mlc election up ) संपली. भाजपचे उमेदवार शैलेंद्र प्रताप सिंह विजयी झाले आहेत. समाजवादी पक्षाचे उमेदवार शिल्पा प्रजापती यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला. भाजपचे शैलेंद्र प्रताप सिंह यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार शिल्पा प्रजापती यांचा १३६२ मतांनी पराभव केला. भाजपचे शैलेंद्र प्रताप सिंह यांना 2481 तर सपाच्या शिल्पा प्रजापती यांना 1119 मते मिळाली. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल कम्युनिटी हॉलमध्ये मतमोजणी ( up mlc election result ) झाली आहे.

फारुखाबाद : भाजपचे उमेदवार प्रांशु दत्त द्विवेदी विजयी - भाजपचे उमेदवार प्रांशु दत्त द्विवेदी यांना ४१३९ मते मिळाली आहे. सपाचे उमेदवार हरीश यादव यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. त्यांना 657 मते मिळाली. भाजपचे उमेदवार 3482 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपवर बूथ कॅप्चरिंगचा आरोप करत संतोष यादव म्हणाले की, प्रशासनामुळे भाजपचा विजय झाला आहे, आम्ही न्यायालयात जाणार आहोत. आमचे सपाचे नेते मुंबईत होते. त्यांचे मतदान येथे झाले. तिन्ही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाच्या देखरेखीखाली बुथ कॅप्चरिंग करण्यात आले. सपाचे उमेदवार संतोष यादव यांचा 887 मतांनी पराभव झाला आहे.

झाशीतून भाजपचे रामा निरंजन विजयी -जालौन-ललितपूर एमएलसी निवडणुकीत भाजपच्या रामा निरंजन यांनी सुमारे ५७९ मतांनी विजय मिळवला. त्यांनी माजी सपा उमेदवार श्याम सुंदर सिंग यांचा पराभव केला.

अयोध्या : भाजपचे हरि ओम पांडे विजयी-अयोध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हरी ओम पांडे यांना २७२४ मते मिळाली आहेत. समाजवादी पक्षाचे उमेदवार हिरालाल यांना 1,044 मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार हरी ओम पांडे यांचा विजयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

बलियामधून भाजपचे उमेदवार रविशंकर सिंह पप्पू विजयी- भाजप उमेदवाराला 2,259 मते मिळाली आहेत. सपा उमेदवाराला 278 मते मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सतपाल सैनी यांनी मुरादाबादमधून निवडणुकीत विजय मिळवला. सपा उमेदवार अजय मलिक यांचा भाजप उमेदवार सतपाल सैनी यांचा पराभव झाला. भाजप उमेदवाराला 6,640 मते मिळाली. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला 1,107 मते मिळाली. तर सतपाल सैनी हे 5,533 मतांनी विजयी झाले. सहारनपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे वंदना मुदित वर्मा विजयी- मुझफ्फरनगर विधानपरिषदेची जागा मुदित वर्मा यांनी प्रचंड मतांनी जिंकल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

देवरिया - कुशीनगर येथील समाजवादी पक्षाचे उमेदवार डॉ. कफील खान यांचा आमदारकीच्या निवडणुकीत पराभव झाला. डॉ. कफील खान यांना 1031 मते मिळाली. तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रतन पाल सिंह 4255 मते मिळवून विजयी झाले आहेत. समाजवादी पक्षाचे उमेदवार डॉ. कफील खान यांचा 3224 मतांनी पराभव झाला. पराभवानंतर डॉ.कफील खान यांनी भारतीय जनता पक्षावर आरोप करत भारतीय जनता पक्षाने लोकशाहीची हत्या केल्याचे म्हटले आहे.

गोरखपूरमधून भाजपचे सीपी चंद विजयी- आग्रामध्ये भाजपचे विजय शिवहरे विजयी झाले आहेत. आझमगडच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर आणि आमदार यशवंत सिंह यांचे पुत्र विक्रांत सिंह रिशू सिंग यांनी भाजप उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. विक्रांत सिंह रिशू यांना एकूण 4075 मते मिळाली. त्याचवेळी भाजपचे उमेदवार अरुणकांत यादव यांना 1,262 तर सपाचे उमेदवार राकेश यादव यांना केवळ 356 मते मिळाली. गोरखपूरमधून भाजपचे सीपी चंद निवडणुकीत विजयी झाले. निवडणूक आयोगाने ( election commission ) अद्याप ( up mlc election result 2022 ) संपूर्ण निकाल जाहीर केले नाहीत.

हेही वाचा-Nana Patole Slammed Modi Gov : आरक्षण मोडीत काढण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न - नाना पटोले

हेही वाचा-लोकसंख्येच्या बाबतीत मुस्लिम हिंदूंना मागे टाकू शकतात असा हा केवळ "प्रचार" - कुरैशी

हेही वाचा-Shivpal Yadav Follows Top BJP Leaders : शिवपाल यादव यांनी ट्वीटरवर फॉलो केले भाजपच्या मोठ्या नेत्यांना; भाजपत प्रवेश करण्याची शक्यता!

ABOUT THE AUTHOR

...view details