महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश सरकारने 'काकोरी कांड'चे नाव बदलून केले 'काकोरे ट्रेन अॅक्शन' - Kakori train action

भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे म्हणजे अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यानिमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी काकोरी ट्रेन अॅक्शन अंतर्ग चौरी चौरा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले.

काकोरी कांड
काकोरी कांड

By

Published : Aug 9, 2021, 2:52 PM IST

लखनौ - शहरांची नावे बदलण्यात येणाऱ्या योगी सरकारने इतिहासातील घटनेचे नाव बदलले आहे. इंग्रज राजवटीतील काकोरी कांड ऐवजी काकोरी ट्रेन अॅक्शन हे नाव उत्तर प्रदेश सरकारने बदलले आहे. कांड हे नाव अपमानास्पद असल्याने बदलण्यात येत असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.

भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे म्हणजे अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यानिमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी काकोरी ट्रेन अॅक्शन अंतर्ग चौरी चौरा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काकोरी शहीद स्मारक येथे स्वातंत्र्यवीर रोशन सिंह, रामप्रसाद बिस्मिल आणि राजेंद्र लाहिरी यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. यावेळी विविध मंत्री आणि अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

हेही वाचा-मोदींकडून 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19,500 कोटी जमा, किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता मिळाला

योगी सरकारने विविध शहरांची नावे बदलली आहेत. तर नुकतेच मोदी सरकारने केंद्र सरकारकडून खेळाडूंना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे. या पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार ठेवण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केली आहे.

हेही वाचा-मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर विचार सुरू, सरकारची लोकसभेत माहिती

काय आहे काकोरी कट-

स्वातंत्र्य संग्रामामध्ये इंग्रजांना देशाबाहेर घालवण्‍यासाठी चंद्रशखेर आझाद आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी काकोरीजवळ रेल्‍वे लुटली. या घटनेला '9 ऑगस्‍ट 1925 चा काकोरी कट' म्‍हणून ओळखले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details