लखनऊ :उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. हा लॉकडाऊन आता ३१ मे सकाळी सात वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. प्रशासनाने शनिवारी याबाबत माहिती दिली.
"राज्यातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी उत्तर प्रदेश सरकार कटिबद्ध आहे. यामुळेच आम्ही सध्या लागू असलेला अंशतः लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाऊन सुरू करताच आपल्याला याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले होते. आता या लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे." असे सरकारने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
"राज्यातील नागरिकही या लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळेच हा लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहतील. बाकी आस्थापने बंद राहणार आहेत." असेही या पत्रकात सांगितले आहे.