महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UP Elections : युपीत निवडणुकांचा तिसरा टप्पा, संंध्याकाळी 6 पर्यंत 60.82 टक्के मतदान

Uttar Pradesh Elections Live Updates
युपीत निवडणुकांचा तिसरा टप्पा

By

Published : Feb 20, 2022, 7:23 AM IST

Updated : Feb 21, 2022, 6:44 PM IST

22:44 February 20

उत्तर प्रदेशात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 60.82 टक्के मतदान झाले आहे.

संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचे मतदान

18:19 February 20

उत्तर प्रदेशात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.6 टक्के मतदान झाले आहे.

दुपारी 5 वाजेपर्यंतचे मतदान

16:48 February 20

उत्तर प्रदेशात दुपारी 3 वाजेपर्यंत 48.8 टक्के मतदान झाले आहे.

दुपारी 3 वाजेपर्यंतचे मतदान

13:48 February 20

उत्तर प्रदेशात दुपारी 1 वाजेपर्यंत 35.8 टक्के मतदान झाले आहे.

दुपारी 1 वाजेपर्यंतचे मतदान

13:22 February 20

कानपूर येथील व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश भल्ला यांनी एक अनोखा पुढाकार घेतला आहे. ते मतदानासाठी येणाऱ्यांना मोफत नाश्ता देत आहेत.

11:56 February 20

उत्तर प्रदेशात मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 21.2 टक्के मतदान झाले आहे.

सकाळी 11 वाजेपर्यंतचे मतदान

11:53 February 20

समाजवादी पार्टीचे संस्थापक-संरक्षक मुलायम सिंह यादव सैफई येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

11:42 February 20

सपा प्रमुख आणि करहल येथील पक्षाचे उमेदवार अखिलेश यादव यांनी जसवंतनगर येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

09:47 February 20

उत्तर प्रदेशमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 8.15 टक्के मतदान झाले आहे.

09:06 February 20

प्रगतीशील समाजवादी पार्टी (लोहिया) प्रमुख शिवपाल सिंह यादव यांनी मतदानाचा हक्क बजावला

2022 मध्ये अखिलेश यादव मुख्यमंत्री होणार हे तिसऱ्या टप्प्यातील मतदानाने स्पष्ट केले आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही. 300 हून अधिक जागांसह प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले जाईल, असे प्रगतीशील समाजवादी पार्टी (लोहिया) प्रमुख शिवपाल सिंह यादव यांनी मतदान केल्यानंतर म्हटलं.

09:05 February 20

मुलायम सिंह यादव यांचे भाऊ अभय राम यादव यांनी आज सैफई येथे मतदान केले. या निवडणुकीत समाजवादी पक्षाचा मोठा विजय होईल, असे ते म्हणाले.

07:22 February 20

तिसऱ्या टप्प्यात मतदानाला सुरवात

07:16 February 20

हे प्रमुख नेते आज आमने-सामने

आज तिसऱ्या टप्प्यात मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे. येथून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री प्राध्यापक एसपी सिंह बघेल आणि प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आमने सामने आहेत. हा मतदारसंघ समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. करहल विधानसभेच्या जागेवर समाजवादी पार्टीचे मोठे वर्चस्व आहे. ही जागा समाजवादी पार्टीची सुरक्षित जागा असल्याचे बोलले जात आहे. 1993 पासून येथे समाजवादी पार्टी सातत्याने विजयी आहे. 2002-2007 मध्ये ही जागा भाजपाने एकदाच जिंकली होती. करहल मतदारसंघ मैनपुरी जिल्ह्यात येतो, जो यादव कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते अखिलेश यादव यांच्या विजयाचा दावा करत आहेत.

07:16 February 20

आज 627 उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम बंद होणार -

उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांतील 59 जागांसाठी आज मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम यूपीतील फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, कासगंज आणि हाथरस या 5 जिल्ह्यांत मतदान होणार आहे. झाशी, जालौन, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा जिल्ह्यात बुंदेलखंड प्रदेशात विधानसभेच्या 13 जागा आहेत. याशिवाय अवध प्रदेशातील कानपूर, कानपूर देहाट, औरैया, फर्रुखाबाद, कन्नौज आणि इटावा या 27 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात 2 कोटी 15 लाख 75 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये 627 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

06:30 February 20

Uttar Pradesh Elections Phase 3 Live Updates : संंध्याकाळी 6 पर्यंत 60.82 टक्के मतदान

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत एकूण 7 टप्प्यात मतदान झाले आहे. अनुक्रमे 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च 2022 रोजी मतदान आयोजित आहे. तर 10 मार्च 2022 रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण 404 जागा आहेत. यात 403 जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा 202 इतका आहे.

पहिला टप्पा -

पहिला टप्पा 10 तारखेला पार पडला ( UP Election 2022 Phase 1 ) होता. पहिल्या टप्प्यात शामली, मुझफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाझियाबाद, हापूर, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा येथे मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 2.27 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजाविला आहे. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार रिंगणात आहेत. यात 73 महिला आहेत. तर 2.27 कोटी मतदार आहेत.

दुसरा टप्पा -

दुसरा टप्पा 14 फेब्रुवरीला पार पडला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहानपूर या 9 जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 ​​जागांसाठी मतदान झाले.

हेही वाचा -Charged Against Police Officers : तीन पोलीस अधिकाऱ्यांवरच खंडणीचा गुन्हा दाखल

Last Updated : Feb 21, 2022, 6:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details