लखनऊ - 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीची लढाई संपली आहे. 10 मार्च रोजी आलेल्या निवडणुकीच्या निकालात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर विजयी नेते अधिक आनंद साजरा करत आहेत, तर दुसरीकडे पराभव पाहणाऱ्या नेत्यांसह त्यांच्या समर्थकांमध्ये शांतता आहे.
सपा समर्थकाने घेतले विष -
निवडणुकीच्या निकालाने निराश झालेल्या तरुणाने शुक्रवारी आत्महत्येचा ( samajwadi party supporters ate poison ) प्रयत्न केला. एका तरुणाचा आत्महत्या करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण आपले नाव नरेंद्र उर्फ विजय यादव सांगत आहे. नरेंद्र उर्फ विजय यादव लखनौमधील कामटा चौरस्त्यावर अवध बसस्थानकाजवळ चहाची टपरी लावतो.
व्हिडिओमध्ये नरेंद्र सांगत आहे की,
1 रोजी त्याने त्याच्या फेसबुकवर कमेंट केली होती की, जर राज्यात अखिलेश यादव यांचे सरकार आले नाही तर आपण आत्महत्या करू. 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल आले असून आता अखिलेश यादव यांचे सरकार स्थापन होत नसल्याचे नरेंद्र सांगतात. त्यामुळे त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.