अलिगढ (उत्तर प्रदेश) :पत्नीशी पटत नसेल तर तिच्यापासून वेगळे होण्यासाठी पती सहसा घटस्फोटाचा अर्ज करतात. परंतु उत्तर प्रदेशात एक अजबच प्रकरण समोर आले आहे. येथे एका पतीने पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी तिच्यावर चक्क दहशतवादी असल्याचे आरोप केले आहेत. एवढेच नाही तर पतीने पोलिसांची भेट घेऊन एटीएसकडून तपास करण्याचीही मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, त्याचे आरोप निराधार असल्याचे सिद्ध झाले. पत्नीपासून सुटका करून घेण्यासाठी पतीने ही युक्ती अवलंबली होती. घटनेचे सत्य जाणून घेतल्यानंतर पोलिसही अचंबित झाले. (husband alleged wife as terrorist).
फेसबुकवर मैत्रीनंतर झाला निकाह :बुलंदशहरचा रहिवासी असलेला सिराज अली सध्या क्वार्सी येथे राहतो. गुरुवारी तो एसएसपीकडे तक्रार करण्यासाठी गेला. त्याने सांगितले की त्याची हसिना वाडियाशी फेसबुकवर मैत्री झाली. हसीनाचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला आहे. तिला 12 वर्षांची मुलगीही आहे. ती डेहराडूनमध्ये शिकते. जेव्हा दोघांची जवळीक वाढली तेव्हा त्यांनी 14 मे 2021 रोजी लग्न केले. यानंतर तो क्वार्सी परिसरातील नागला पटवारी येथे राहू लागला.
पतीने काय आरोप केले : मात्र काही काळानंतर या दोघांमध्ये भांडण होऊ लागले. याला कंटाळून सिराजने हसीनावर दहशतवादी असल्याचे आरोप लगावले. सिराजने हसीनाकडे पुणे आणि दिल्लीचे पत्ते असलेली दोन आधार कार्ड असल्याचा आरोप केला. तसेच तिचे नाव मनीषा आणि पूजा असल्याचे देखील तो म्हणाला. सिराजने हसिना ISIS शी संबंधित असल्याचा आरोपही केला. त्याने हसीनाचे नेटवर्क कोलकाता, पुणे, दिल्ली, नोएडा आणि डेहराडूनला असल्याचे सांगितले. त्याने आरोप केला की, हसीना कुणासोबत तरी मिशनवर असून त्यामुळे देशाचे नुकसान होऊ शकते. तसेच तिच्याकडे चार मोबाईल असल्याचेही तो म्हणाला होता .
म्हणून केले आरोप : त्यानंतर आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन एसएसपी कलानिधी नैथानी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तपासादरम्यान हसीनाने तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्याचे आढळून आले. त्याबदल्यात तिला 21 लाख रुपये मिळाले होते. मात्र सिराजने हे सर्व पैसे उधळून टाकले. त्यामुळे त्याला हसिनासोबतचे नाते संपवायचे होते. या कारणावरून त्याने खोटी तक्रार केली. आता या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :
- Satara Crime : महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला २१ वर्षांनी अटक
- Militant Arrested In Pune: पुण्यात आणखी एका संशयित अतिरेक्याला अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी
- Mumbai Crime News: विमानात डॉक्टर महिलेचा प्राध्यापकाकडून विनयंभग, विमानतळावरून थेट तुरुंगात रवानगी!