महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UP Crime News : धक्कादायक! 'ही' आजी पाच दिवस नातवाच्या मृतदेहासोबत राहिली, दुर्गंध आल्यावर.. - बाराबंकीमध्ये आजी नातवाच्या मृतदेहासोबत

उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथे एक आजी जवळपास पाच दिवस तिच्या नातवाच्या मृतदेहाजवळ बसून राहिली. मृतदेहाची दुर्गंधी पसरल्यानंतर लोकांना हा प्रकार समजला. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

UP Crime News
यूपी क्राईम न्यूज

By

Published : Jun 26, 2023, 7:31 PM IST

बाराबंकी (उत्तर प्रदेश) : एका आजीला आपल्या नातवाची इतकी ओढ होती की तिने त्याला क्षणभरही डोळ्यांपासून दूर जाऊ दिले नाही. नातवाच्या मृत्यूनंतरही आजीला त्याला आपल्यापासून दूर होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळेच ही आजी जवळपास पाच दिवस नातवाच्या मृतदेहाजवळ बसून राहिली. मृतदेहाची दुर्गंधी पसरल्याने ही बाब उघडकीस आली. हे धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारे प्रकरण उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. नातवाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घरातून येत होता दुर्गंध : मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मौहरिया वस्तीतल्या एका घरातून दोन दिवसांपासून येत असलेल्या दुर्गंधांमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले होते. रविवारी दुर्गंधी अधिक पसरल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथे राहणाऱ्या वृद्ध महिलेने त्यांना विरोध केला. अखेर खूप समजावून सांगितल्यानंतर महिलेने दरवाजा उघडला.

मृत्यूनंतर महिला मृतदेहाला कपड्याने पुसायची : घराच्या आत पोहोचताच पोलीस चकित झाले. घराच्या आत बेडवर एक मृतदेह पडलेला होता. त्यातून भयंकर दुर्गंधी येत होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. फिल्ड युनिट घटनास्थळी पोहोचली आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. महिलेच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, ती महिला कोणाशीही बोलत नव्हती. तिने नातवाला घराबाहेर जाऊ दिले नाही. नातवाच्या मृत्यूनंतर ती महिला त्याला रोज कपड्याने पुसायची.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा : कोतवाल संजय मौर्य यांनी सांगितले की, 17 वर्षीय प्रियांशू गेल्या 10 वर्षांपासून त्याच्या आजीसोबत राहत होता. आजीची मानसिक स्थिती ठीक नव्हती. नातवाचा मृत्यू पाच दिवसांपूर्वी झाला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होईल.

हे ही वाचा :

  1. UP Crime News : धक्कादायक! पतीने पत्नीला मिठी मारून पाठीत गोळी झाडली, दोघांचाही मृत्यू
  2. UP Serial Killer : हत्येनंतर वृद्ध महिलांवर करायचा बलात्कार; वाचा सीरियल किलरची धक्कादायक इनसाइड स्टोरी
  3. UP Crime News : आधी प्रेमाच्या जाळ्यात फसवले, मग धर्मांतर करून केला विकण्याचा प्रयत्न ; पोलिसांकडून टोळीचा भंडाफोड

ABOUT THE AUTHOR

...view details