खून प्रकरणातील गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज लखनऊ : उद्यानात फिरायला गेलेल्या भाजपा नेत्याचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना मुरादाबाद येथे गुरुवारी घडली असून अनुज चौधरी असे खून करण्यात आलेल्या भाजपा नेत्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. लवकरच अनुज चौधरी यांचे मारेकरी पकडण्यात येतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
उद्यानात फिरताना गोळी घालून खून :भाजपा नेते अनुज चौधरी हे पाकबाडा येथील अपार्टमेंटमध्ये राहत होते. ते गुरुवारी आपल्या घराजवळील उद्यानात फिरायला गेले होते. यावेळी अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे बेसावध असलेल्या अनुज चौधरी यांच्या वर्मी गोळी लागल्याने ते जागीच कोसळले. मारेकऱ्यांनी गोळीबार करुन घटनास्थळावरुन पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज आले पुढे :भाजपा नेते अनुज चौधरी हे मुळचे संभळमधील नेकपूरचे रहिवाशी होते. गेल्या काही दिवसांपासून ते मुरादाबादमधील पाकबाडा येथील प्रतिभा अपार्टमेंटमध्ये राहतात. घराशेजारील उद्यानात फिरायला गेल्यानंतर त्यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केल्यामुळे मुरादाबादमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनुज चौधरी हे फिरताना दिसत असून त्यांच्यावर अज्ञात मारेकरी गोळ्या झाडताना दिसत आहे. गोळी लागताच अनुज चौधरी हे खाली कोसळताना दिसत आहेत. अनुज चौधरी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्तळाची झाडाझडती घेतली. त्यानंतर पोलिसांनी अनुज चौधरी यांच्या कुटुंबीयांची चौकशी करत त्यांचे कोणाशी वैर होते का, याची देखील चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे आता मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा -
- Sambhajinagar firing : औरंगाबादमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू दुसरा गंभीर
- Jaipur Mumbai Train firing : आरोपी आरपीएफ जवानाला आज तीन वाजता न्यायालयात करण्यात येणार हजर, गोळीबाराचे काय आहे प्रकरण?