लखनौ - उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (UP ATS) धर्मांतरण प्रकरणात तिघांना नागपूरमधून अटक केली आहे. त्यांना शनिवारी रात्री लखनौमध्ये आणण्यात येणार आहे. तीनही आरोपींची लखनौ एटीएस मुख्यालयात चौकशी केली जाणार आहे.
युपी एडीजीचे प्रशांत कुमार म्हणाले, के धर्मांतरण प्रकरणात सर्वात प्रथम उमर गौतम याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर चौकशीनंतर सलाउद्दीन, इरफान शेख, राहुल, भोला, मुफ्ती जहांगीर आलम और मन्नू यादव उर्फ अब्दुल मन्नान यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणातील आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
एटीएस लखनौची टीम महाराष्ट्रात पोहोचली. त्यानंतर कांवरे उर्फ एडम, कौशल आलम और डॉक्टर अर्सलान यांना नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. एडीजी एलओ यांच्या माहितीनुसार आरोपी उमर गौतमचे लोक हे लालच दाखवून इस्लाममध्ये धर्मांतरण करत होते. त्यांनी महिला, अनुसुचित जाती व जमाती तसेच गरीब लोकांना लालच दाखविली होती.
हेही वाचा-चीनबरोबरील सीमावादाचा विषय संसदेत गाजण्याची चिन्हे
काय आहे धर्मांतरण प्रकरण-
धर्मांतरासाठी परदेशातून निधी मिळत आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. धर्मांतर प्रकरणात तीन धर्मगुरूंची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून आले. एटीएस तिन्ही धार्मिक गुरूंची चौकशी करून धर्मांतर प्रकरणाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे. मुळचा बीडचा असलेला इरफान हा दिल्लीच्या मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेलफेयरमध्ये इंटरप्रेटर म्हणून काम करतो. तो मूक-बधीर लोकांना इस्लाम शिकवतो. इरफाननेच मूक-बधिराला आमिष दाखवून धर्म परिवर्तन केले. दुसरा युवक राहुल भोला हा स्वतः मूक बधिर आहे. तो या कामात इरफानची मदत करत होता. इरफानबाबत बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रदीप एकशिंगे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सिरसाळा पोलीस ठाण्याला या प्रकरणाबाबत कुठलीच लेखी माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र दिल्ली पोलिसांनी सिरसाळा गावच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.