उत्तर प्रदेश - विधानसभेपासून ते संसदेपर्यंत धारदार मुद्यांवर होणारा वाद विवाद काही नवीन नाही. सर्व आमदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखणे आणि संसदीय भाषा वापरणे अपेक्षित असले तरी, चर्चेदरम्यान अनेकदा मर्यादा ओलांडल्या जातात. ज्याला कोणत्याही प्रकारे अशोभणीय म्हणता येणार नाही. उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Budget Session of Uttar Pradesh Assembly ) सुरू आहे. तिसऱ्या दिवशी अखिलेश यादव यांनी सभागृहात केलेल्या भाषणात सपा सरकारच्या कामाचे कौतुक केले आणि पायाभूत सुविधांच्या कामांची स्तुती केली. विरोधीपक्ष नेते अखिलेश यादव ( Leader of Opposition Akhilesh Yadav ) यांच्या भाषणानंतर सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य ( Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya ) उत्तर देण्यासाठी उभे राहिले. केशव मौर्य आपल्या भाषणात सपा सरकारवर आरोप करू लागले तेव्हा सपा आमदारांनी गोंधळ सुरू केला.
सभागृहात झालेला वाद विवाद असा राहिला सभागृहातील वाद-विवाद :
'तुमची सायकल पंचर झाली आहे दुरुस्त करुन घ्या'
केशव मौर्य म्हणाले की, अखिलेश यादव यांनी 2014 मध्ये सुपडा साफ होईल, असे सांगितले होते. पण भाजपा बहुमताने आले. आधी 5 वर्षे बाहेर, मग पुन्हा 5 वर्षे बाहेर. पुढची 25 वर्षे तुम्हाला संधी मिळणार नाही. सायकल पंक्चर झाले आहे, दुरुस्त करा, असे उपमुख्यमंत्री केशव यांच्या वक्तव्यावरून सप सदस्यांनी विधानसभेत गोंधळ घातला.
'सैफईतील जमीन विकून कामे केली होती का?'
हे प्रकरण वैयक्तिक हल्ल्यांपर्यंत पोहोचले. केशव मौर्य यांनी सभागृहातील विरोधीपक्ष नेते अखिलेश यादव यांच्यावर घणाघाती हल्ला चढवत, आपल्या सरकारच्या कामगिरीचा दाखला देत त्यांनी विचारले की, सैफईतील जमीन विकून कामे केली होती का?
'तुम्ही काय तुमच्या वडिलांच्या पैशांनी काम करत आहात का?'
केशव मौर्य यांच्या या हल्ल्याने स्तब्ध झालेले अखिलेश यादव चांगलेच चिडले, त्यांनी प्रत्युत्तरात विचारले की, ‘तुम्ही तुमच्या वडिलांच्या पैशातून काम करून घेत आहात का, तुम्ही घरून आणून रस्ता बनवता की रेशनचे वाटप करता?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी सांभाळले प्रकरण :प्रकरण वाढत असल्याचे पाहून सभागृहात उपस्थित असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे प्रकरण सांभाळले. सपा सदस्यांच्या गदारोळात मुख्यमंत्र्यांनी बचाव केला आणि म्हटले की, तासाभराहून अधिक काळ संपूर्ण सभागृहाने शांततेत विरोधी पक्षनेत्याचे म्हणणे ऐकून घेतले. या सभागृहात सरकारचे उपमुख्यमंत्री हे प्रकरण मांडत आहेत, मग या अशा भाषेचा नेमका काय उपयोग. हे बरोबर नाही. सरकारने विकासकामे करून घेतली. उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशी भाषा सभागृहात प्रतिष्ठेची नाही.
मुख्यमंत्र्यांनी केली विरोधकांवर टीका : मुख्यमंत्री योगी पुन्हा म्हणाले की, कोणताही सदस्य बोलत असेल, विशेषत: उपमुख्यमंत्री बोलत असतील, तर मधेच रनिंग कॉमेंट्री करणे योग्य नाही. एकमत नसणे हे लोकशाहीचे बलस्थान आहे. आम्ही संपूर्ण भाषण ऐकले, पण सरकारच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यासाठी शालीनता वागणूक असावी, असेही योगी म्हणाले.
हेही वाचा -Yasin Malik Reaction : यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा-दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाचा निकाल