नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार उन्मुक्त चंद ( Former captain Unmukt Chand ) याने आपले काही फोटो शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. 29 वर्षीय उन्मुक्तने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो अमेरिकेसाठी क्रिकेट खेळत आहे.
दरम्यान, उन्मुक्त चंद यांनी त्यांचे दोन फोटो ट्विटरवर शेअर केले ( Unmukt Chand shared photo ) आहेत. त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत ( Unmukt Chand eye injury ) झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे त्याचा डोळा वाचला आहे. काही अनुचित घटना घडली असती तर त्याची कारकीर्द उद्ध्वस्त होऊ शकली असती.
देवाने मोठ्या संकटातून वाचवले -
उन्मुक्त चंदला ही दुखापत कशामुळे झाली, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. या खेळाडूने फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, 'एथलीटसाठी रस्ता सोपा नसतो. कधी जिंकून परत येतो, तर कधी निराश होतो. परंतु काहीवेळा तुम्ही ओरखडे आणि जखमांसह घरी परतता ( Unmukt Chand eye injured in US ). मी देवाचा आभारी आहे, ज्याने मला मोठ्या दुर्दैवी संकटापासून वाचवले आहे.
उन्मुक्तने आपल्या पोस्टमध्ये खेळाडूंना खेळताना काळजी घेण्यास सांगितले आहे. त्याने पुढे लिहिले की, 'खूप खेळा, पण सुरक्षिततेची काळजी घ्या. दोघांमध्ये एक पातळ रेषा आहे. शुभेच्छांबद्दल धन्यवाद.' उन्मुक्त बिग बॅश लीग ( BBL ) खेळणारा पहिला भारतीय आहे.