नंदुरबार : तुमच्यापैकी अनेकांनी नवापूर रेल्वे स्टेशनबद्दल ऐकले असेल. परंतु या रेल्वे स्थानकाच्या बाबतीत अशी बाब आहे जी तुम्हाला माहित नसेल की हे स्थानक दोन राज्यांमध्ये आहे. लवकर समजेल अशा भाषेत सांगायच तर हे रेल्वे स्थानक दोन राज्यांच्या सीमेवर बांधलेले आहे. या रेल्वे स्थानकाचा अर्धा भाग हा आपल्या महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातला आहे. तर राहिलेला अर्धा भाग हा गुजरातच्या तापी जिल्ह्यात आहे.
चार भाषांमध्ये दिली जातेय माहिती:हे स्थानक अनेक अर्थांनी अद्वितीय आहे. रेल्वेच्या या अनोख्या अशा स्थानकावर रेल्वेशी संदर्भात सर्व प्रकारची माहिती चार भाषांमध्ये देण्यात आली आहे. मराठी, गुजराती, इंग्रजी आणि हिंदी भाषांचा वापर करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या रेल्वे स्थानकावर याच चार भाषांमध्ये घोषणाही केल्या जातात. या अनोख्या स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना एक वेगळी अनुभूती अनुभवण्यास मिळते. यापेक्षा विशेष म्हणजे प्लॅटफॉर्मवर एक बाक आहे, ज्याचा एक भाग महाराष्ट्रात आहे आणि दुसरा भाग गुजरातमध्ये आहे. या दोन राज्यांच्या बाकावर बसल्यानंतर लोकांना खूप आनंद झालेला पाहावयास मिळतो.
फाळणीपूर्वी झाली होती बांधणी:नवापूर रेल्वे स्थानकाची एक मोठी कथा आहे. पूर्वीच्या एकत्रित असलेल्या दोन प्रांतांची 1 मे 1961 रोजी विभागणी करून दोन राज्ये तयार केली तेव्हा हे स्टेशन नेमके दोन्ही राज्यांच्या सीमेवर आले. त्यानंतर दोन राज्यांमध्ये असले तरी हे रेल्वे स्थानक दोन्ही राज्यांच्या सीमेवर आहे तसे ठेवावेत असा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेताना हे स्टेशन कोणत्याही एका राज्यात घेता आले असते. मात्र तसे करण्यात आले नाही. दोन राज्यांमध्ये असलेल्या या रेल्वे स्थानकाची आता वेगळी ओळख बनली आहे.
स्टेशनवर झालाय सेल्फी पॉईंट:सोशल मीडियाकडे लोकांचा वाढता कल पाहता येथे सेल्फी पॉइंटही बनवण्यात आला आहे. येथे मोठ्या संख्येने प्रवासी फोटो काढतात. त्याहूनही मजेशीर गोष्ट म्हणजे नवापूर स्टेशनचा स्टेशन मास्तर गुजरातमध्ये बसतो, तर त्याची खिडकी महाराष्ट्रात येते. एकूण 800 मीटर लांब असलेल्या नवापूर या रेल्वे स्थानकाचा एक 300 मीटरचा भाग महाराष्ट्रात येतो, तर दुसरा सुमारे 500 मीटर लांब असलेला भाग हा गुजरातमध्ये येतो.
हेही वाचा: इंदिरा गांधींनी वाघाच्या बछड्याला घेतले होते कडेवर, अन् मोदींनी