महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

VIDEO: नागीनीसाठी नागाने दिला जीव, प्रेमकहाणी पाहून तुम्हीही व्हाल भावूक - Snake give up life for her partner

आज आम्ही तुम्हाला एका खऱ्या प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत. मुक्या प्राण्यांची प्रेमकहाणी. नाग आणि नागीनीची ही प्रेमकहाणी ( Love Story of a snake in Gopalganj ) ज्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली त्याचा यावर विश्वास बसला नाही. ही ना चित्रपटाची कथा आहे ना किस्सा. वाचा गोपालगंजचा हा स्पेशल रिपोर्ट

snake in Gopalganj
snake in Gopalganj

By

Published : May 11, 2022, 7:34 PM IST

गोपालगंज: आतापर्यंत तुम्ही चित्रपटांमध्ये 'नाग आणि नागीनची लव्हस्टोरी' अनेकवेळा पाहिली असेल, ज्यामध्ये नागीन आपल्या नागाच्या मृत्यूचा बदला घेते. पण आज आम्ही तुम्हाला नाग नागीनची खरी प्रेमकहाणी सांगणार आहोत, ज्यामध्ये नाग आपल्या नागीनीचा जीव वाचवू शकत नाही आणि त्यानंतर नागीनीसोबत आपल्या प्राणाचाही त्याग ( Snake give up life for her partner) करते. ही घटना बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील आहे.

नाग-नागीनीची वेदनादायक प्रेमकथा: बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात, एका तरुणाने स्याही नदीजवळच्या तलावात मासे पकडण्यासाठी जाळे टाकले. जाळ्यात एक नागीन अडकली. नागीन अडकल्याचे पाहून सापही तेथे पोहोचला आणि नागीनीला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. नाग बराच वेळ नागीनीला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिला, पण ती या जाळ्यातून सुटू शकली नाही. हे पाहून नाग धडपडू लागला आणि स्वतःही जाळ्यात अडकला.

नागीनीसाठी नागाने दिला जीव

नागीनीचा जीव वाचवण्यासाठी नागाने त्यागले प्राण : शेवटी नागाने सुद्धा तोच निर्णय घेतला, जो निर्णय प्रेमी युगुल घेतात. जाळ्यातू बाहेर पडण्याच्या प्रयत्नात नागीनीचा मृत्यू झाला. त्यानंतर नागानेही आपला जीव सोडला. नागाचे प्रेम पाहून तरुणही थक्क झाला. हा संपूर्ण प्रकार त्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून आजूबाजूच्या लोकांना दाखवला. यानंतर संपूर्ण गावात नाग-नागिनीच्या वेदनादायक कहाणीची चर्चा होत आहे.

गावकऱ्यांनी दोघांनाही एकत्रच केले दफन : हा व्हिडिओ ज्याने पाहिला त्याचे डोळे ओले झाले. गावकऱ्यांनी नाग आणि नागीन यांना माशांच्या जाळ्यातून बाहेर काढले आणि दोघांनाही जमिनीत दफन केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप बघितला जात आहे. त्याच बरोबर नाग आणि नागिनीच्या अद्भूत प्रेमकथेचीही गावात चर्चा होत आहे. "प्रेम फक्त माणसंच करत नाहीत, मुके प्राणीही त्याची भाषा समजतात" असं प्रत्येकाला म्हणावं लागेल. जो कोणी नाग आणि नागिनीच्या प्रेमकहाणीबद्दल ऐकत आहे, तो सहसा यावर विश्वास ठेवू शकत नाही.

हेही वाचा -Pune : पोटच्या मुलाला 2 वर्ष कोंडले श्वानाच्या रुममध्ये, मुलगा वागू लागला श्वानासारखे

ABOUT THE AUTHOR

...view details