महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Helicopter-shaped car: कारचे बनवले हेलिकॉप्टर! बिहारमध्ये वधून-वरांकडून मोठी मागणी - बिहारमध्ये कारचे बनवले हेलिकॉप्टर

लग्नाचा मोसम लक्षात घेऊन कैमूरमध्ये कारचे हेलिकॉप्टरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर साडेसात लाख खर्चून तयार करण्यात आला आहे. ते भाड्याने घेण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

कारचे बनवले हेलिकॉप्टर
कारचे बनवले हेलिकॉप्टर

By

Published : Nov 14, 2022, 8:03 PM IST

कैमूर (बिहार) - सण संपल्यानंतर आता लग्नांचा हंगाम सुरू झाला आहे. बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील मोहनिया येथे राहणाऱ्या एका मॅरेज हॉलच्या मालकाने 8 महिन्याच्या कष्टाने आपल्या कारला हेलिकॉप्टर केले आहे. आता त्याची वॅगनआर कार हेलिकॉप्टरमध्ये बदलली आहे. ही कार चालत असून उडत नाही. मात्र, लग्नाच्या हंगामात तिची मागणी वाढली आहे.

हेलिकॉप्टरमध्ये बनवली वॅगनआर कार - कैमूरमध्ये वर राजासोबत हेलिकॉप्टर कार रस्त्यावर धावण्याची ही पहिलीच वेळ असेल. कैमूर व्यतिरिक्त त्यांना जवळच्या रोहतास, भोजपूर आणि बक्सर जिल्ह्यांमधूनही ऑर्डर मिळत आहेत. कार मालकाने कारचे किमान बुकिंग 7 हजार रुपये ठेवले आहे. सध्या त्याची मागणी खूप वाढली आहे. जेव्हापासून ते कैमूरमध्ये आले आहे, तेव्हापासून ते लोकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.

नववधू हेलिकॉप्टरने सासरच्या घरी - कार मालक अमरनाथ कुमार गुप्ता यांनी सांगितले, की आम्ही ही कार आणली आहे. खूप विचार करून मुंबईहून सात लाख रुपये खर्चून तयार करण्यात आली आहे, जेणेकरून बाजारात नवीन वस्तू दिसावी आणि विशेषत: वऱ्हाडींसाठी हे वाहन वधू-वरांना घेण्यासाठी आकर्षित ठरावे त्यासाठी हे केले आहे. या गाडीला 'दुल्हन चली ससुराल' असे नाव दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details