इंदूर/रतलाम (मध्यप्रदेश) - रतलाम जिल्हा रुग्णालयात एका अनोख्या बाळाचा जन्म ( Unique Child in MP ) झाला असून या बाळाला दोन तोंड आणि तीन हात ( child born with two heads and three hands ) आहेत. मुलाला उपचारासाठी इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून, त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ( unique child born in ratlam at Madhya Pradesh )
लोक आश्चर्यचकित - जावरा येथे राहणाऱ्या सोहेल खानच्या पत्नीची प्रसूती झाली. रतलाम जिल्हा रुग्णालयात ऑपरेशननंतर बाळाचा जन्म झाला. मुलाला पाहून पालकांसह डॉक्टरही अचंबित झाले. वास्तविक, मुलाचे दोन डोके आणि तीन हात होते, त्यानंतर मुलाला तातडीने इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले, जिथे मुलावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.