छिंदवाडा (म.प्र) -तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज पैशांची देवाण घेवाण ही डिजिटल पद्धतीने होत आहे. खिशात पैशे बाळगण्याऐवजी बरेच जण खरेदी करताना या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. जवळ पैसे नसल्यास हे तंत्रज्ञान सोयिस्कर ठरत आहे. कदाचित हिच बाब छिंदवाड्यातील भिकाऱ्याने हेरली असावी. हा भिकारी डिजिटल पेमेंट सेवेचा वापर करून भीक ( Chhindwara beggar accept digital payment ) मागत आहे. हेमंत सूर्यवंशी, असे या भिकाऱ्याचे नाव आहे. तो बारकोड स्कॅनद्वारे लोकांकडून भीक घेतो.
हेही वाचा -KCR - Thackeray Meet : सुडाचे राजकारण ही आमची संस्कृती नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
लोक चिल्लर नसल्याचे सांगत असल्याने ही युक्ती
भिखारी हेमंत सूर्यवंशी याने सांगितले की, जेव्हा तो लोकांना भीक मांगायचा तेव्हा अनेक लोक चिल्लर नसल्याचे कारण सांगायचे. या पार्श्वभूमीवर हेमंतने डिजिटल पेमेंट तंत्रज्ञानाच्या मध्यमातून बारकोडद्वारे भीख घ्यायला सुरुवात केली. जी लोक चिल्लर नसल्याचे कारण देतात, त्यांच्याकडून तो बारकोडद्वारे भिक घेतो.