महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्र्यांचे टूलकिटवरील ट्विट मॅनीप्युलेटिव्ह मीडिया' म्हणून टॅग करावे- काँग्रेसची ट्विटरकडे मागणी - Twitter in Delhi and Gurgaon

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि महासचिवर रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विटरचे मुख्य कायदेशीर, धोरण अधिकारी विजया गड्डे यांना पत्र लिहून भाजप नेत्यांचे ट्विट मॅनीप्युलेटिव्ह मीडिया असे टॅग करावे, अशी मागणी केली आहे. सुरजेवाला यांनी ट्विटरचे उपाध्यक्ष जीम बेकर यांनाही पत्र लिहिले आहे.

ट्विटर
ट्विटर

By

Published : May 25, 2021, 7:38 PM IST

नवी दिल्ली- काँग्रेस आणि भाजपमध्ये ट्विटरवरील टूलकिटवरून आणखी तणाव निर्माण झाला आहे. अनेक केंद्रीय मंत्री टुलकीट संदर्भात दावे करत आहेत, त्यांचे ट्विट हे मॅनीप्युलेटिव्ह मीडियामध्ये दर्शवावे, अशी काँग्रेसने समाज माध्यम कंपनी ट्विटरकडे मागणी केली आहे. भाजपच्या नेत्यांकडूनही टूलकिटबाबत खोटे दावे केले जात असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि महासचिवर रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विटरचे मुख्य कायदेशीर, धोरण अधिकारी विजया गड्डे यांना पत्र लिहून भाजप नेत्यांचे ट्विट मॅनीप्युलेटिव्ह मीडया असे टॅग करावे, अशी मागणी केली आहे. सुरजेवाला यांनी ट्विटरचे उपाध्यक्ष जीम बेकर यांनाही पत्र लिहिले आहे.

हेही वाचा-उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्तभेट; निलेश राणेंचा गौप्यस्फोट

काँग्रेसने टूलकिटची तयार केलेली दावा करणारी कागदपत्रे बनावट आहेत. ही कागदपत्रे भाजपच्या नेत्यांनी तयार केली आहेत. चुकीच्या पद्धतीने राजकीय लाभ मिळविण्यासाठी राजकीय धोकादायक, चुकीची आणि भेसळ केलेली माहिती पसरविली जात असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री शांडिल्य गिरीराज सिंह, पीयूष गोयल, स्मृती इराणी, रवीशंकर प्रसाद, प्रल्हाद जोशी, धर्मेंद्र प्रधान, रमेश पोखरियाल निशांक, थवारचंद गेहलोत, डॉ. हर्ष वर्धन, मुख्तार अब्बास नक्वी आणि गजेंद्र सिंह शेखावत यांचे ट्विट देण्यात आलेले आहे.

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसकडून टूलकिट तयार करण्यात आल्याचे ट्विटमध्ये म्हटले होते. हे ट्विट ट्विटरने मॅनीप्युलेटिव्ह मीडिया म्हणून दाखविले होते.

हेही वाचा-विशाखापट्टणम येथील एचपीसीएल रिफायनरीमध्ये भीषण आग

टूलकिट म्हणजे काय?

  • टूलकिट एक पुस्तिका किंवा डॉक्युमेंट असते. कारण किंवा समस्येचे स्पष्टीकरण देण्यासाठी ती तयार केली जाते. एखादी मोहीम टिकवून ठेवण्यासाठीचा तो एक मौल्यवान स्त्रोत आहे. मोहिमेसाठी कृती करण्याच्या योजनेचाही यात समावेश असू शकतो.
  • एखादी समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवल्यास त्यासंबंधी व्यावहारिक सल्ला आणि मार्गदर्शन प्रदान करण्याच्या दस्तावेजांना टूलकिट म्हटले जाते. विशेषत: जेव्हा समस्या उद्भवत आहे किंवा विकसित होत आहे, अशावेळी टूलकिटचा वापर होतो.
  • एखाद्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी काय करावे लागेल याची माहितीदेखील टूलकिट प्रदान करू शकते. या दस्तावेजात मूलभूत समस्या, याचिका, निषेधाचा तपशील आणि आजूबाजूच्या हालचालींविषयी माहिती असू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details