नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तारापूर्वी आज केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र दिसून आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद आणि केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजीनामे दिले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळातील १२ मंत्र्यांचे राजीनामे हे राष्ट्रपतींनी स्वीकारले आहेत.
केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री देवश्री चौधरी यांनीही राजीनामा दिला आहे. केंद्रीय कामगार मंत्री गंगवार यांच्या कामगार आणि रोजगार विभागाची जबाबदारी होती. केंद्रीय मंत्री गंगवार यांनी राजीनामा दिल्याची पुष्टी केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कोणती जबाबदारी दिली जाणार, याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे राष्ट्रपतींनी या मंत्र्यांचा स्वीकारला राजीनामा
- केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा
- केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री देवश्री चौधरी
- केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार
- केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल
- केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन
- केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर
- केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद
- केंद्रीय सामाजिक न्यााय मंत्री थावरचंद गहलोत
- केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री अंबाला रतन लाल कटारिया
- केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबी
- केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री प्रताप चंद्र सारंगी
- रिपोर्टनुसार केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा व केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री, दुग्धोत्पादन आणि मत्स्योद्योग यांनीही राजानीमे दिले आहेत.
- या यादीत भाजपचे खासदार आणि केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री संजय धोत्रे आणि अंबाला रतन लाल कटारिया यांचाही समावेश आहे.
- केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्याकडे वन्न आणि हवामान बदल विभागाची जबाबदारी होती. सुप्रियो यांनीदेखील राजीनामा दिला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबी यांनी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजीनामा दिला आहे.