महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींवर साधला निशाणा

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज संसदेत काँग्रेसला घेरले. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर झाल्यापासून द्रौपदी मुर्मू काँग्रेस पक्षाच्या द्वेषाच्या आणि उपहासाच्या बळी ठरल्या आहेत असे त्या म्हणाल्या. काँग्रेस पक्षाने तर त्यांना कठपुतळी म्हटले होते, याची आठवण इराणी यांनी करुन दिली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींवर साधला निशाणा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींवर साधला निशाणा

By

Published : Jul 28, 2022, 12:05 PM IST

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस घटनात्मक पदांवर महिलांची बदनामी करत आहेत. आपल्या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपतींचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसने संसदेत आणि भारताच्या रस्त्यावर माफी मागणे आवश्यक आहे. काँग्रेसजनांना माहित आहे की भारताच्या राष्ट्रपतींना संबोधित करण्याची ही पद्धत केवळ त्यांच्या घटनात्मक स्थानाचेच नव्हे तर समृद्ध आदिवासी वारसा देखील दर्शवते.

राष्ट्रपतींना बदनाम करणे म्हणजे आपल्या देशातील महिलांची क्षमता कमी जोखणे असे आहे. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिल्यापासून काँग्रेसकडून त्यांच्यावर द्वेषपूर्ण शब्दात निशाणा साधला जात आहे. राष्ट्रपतीपदी निवड होऊनही त्यांच्यावरील हल्ले थांबताना दिसत नाहीत. सोनिया गांधींनी नियुक्त केलेले सभागृह नेते अधीर रंजन यांनी द्रौपदी मुर्मू यांना देशाची पत्नी म्हणून संबोधित केले होते. यावरुन त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप खासदारांनीही महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.

दुसरीकडे राष्ट्रपतींसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्यावर अधीर रंजन चौधरी यांनी आपली चूक मान्य केली आहे. तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले. मी चुकून 'राष्ट्रपत्नी' म्हणालो होतो, आता यासाठी मला फासावर लटकवायचे असेल तर तुम्ही करू शकता. सत्ताधारी विचारपूर्वक षड्यंत्र रचून पराचा कावळा करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details