महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Smriti Irani IN Trouble : स्मृती इराणींच्या कुटुंबियांचा बेकायदेशीर कॅफे, गोव्यात राजकीय वातावरण तापले - Bar And Restaurant

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी ( Smriti Irani ) यांच्या कुटुंबीयांच्या बारदेश तालुक्यातील आसगाव येथील कथित बेकायदेशीर बार अँड रेस्टॉरंटच्या ( Bar And Restaurant ) मुद्द्यावरून एकच गदारोळ झाला आहे. काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरला असून गोव्यापासून दिल्लीपर्यंतचे वातावरण तापले आहे.

Smriti Irani IN Trouble
Smriti Irani IN Trouble

By

Published : Jul 24, 2022, 2:36 PM IST

Updated : Jul 24, 2022, 9:02 PM IST

पणजी - केंद्रीय मंत्री अभिनेत्री स्मृती इराणी ( Smriti Irani ) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांची मुलगी जोश इराणीमुळे वादात सापडल्या आहेत. वास्तविक, स्मृती यांची मुलगी गोव्यात सिली सोल नावाचा कॅफे बार ( Bar And Restaurant ) चालवते. कॅफेमध्ये बेकायदेशीरपणे बार चालवल्याबद्दल उत्पादन शुल्क आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. कॅफेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे की, ज्या व्यक्तीच्या नावाने हा बार चालवला जात आहे त्या व्यक्तीचा गेल्या वर्षी (2021) मृत्यू झाला आहे.

गोव्यात काँग्रेसचे आंदोलन


स्मृती इराणींच्या मुलीच्यासिलीसोल कॅफेबाहेर गोवा महिला काँग्रेसने शनिवारी संध्याकाळी आंदोलन करत इराणी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. इराणी यांच्या कॅफेला परवानगी देण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे. इराणी यांच्या या कॅफेचे एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

Smriti Irani IN Trouble


अमित पाटकरम्हणाले की, गोव्यात सीली सोल कॉफे जो स्मृती ईराणींच्या नातेवाईकाचा आहे, याबद्दल त्यांनी माहिती दिली पाहिजे. स्मृती ईराणी यांनी राजीनामा दिला पाहिजे. एका व्यक्तीने डिसेंबर 2020 मध्ये आधार कार्ड तयार केले. त्यानंतर जानेवारी 2021 एक्साईज लाईसन्ससाठी प्रस्ताव दिला. गोव्याच्या एक्साईज नियमानुसार लाईसन्ससाठी तुम्हाला रेस्टॉरंट असायला हवे. मात्र, रेकॉर्डवरून मिळालेल्या माहितीनुसार तिथे रेस्टॉरंट नव्हतेच. आधी लायसन्स घेतले आणि मग रेस्टॉरंट सुरू केले. हा पहिला घोटाळा आहे. त्यांनी ज्यांच्या नावावर लायसन्स घेतले आहे, तो माणूस 17 मे 2021 मृत झाला आहे. 22 जून 2022 ला त्या माणसाचे भूत येते आणि लायसन्ससाठी अर्ज करते. त्यावरुन सरकारने त्यांना लायसन्स दिले, हा आणखी मोठा घोटाळा केला आहे, असा आरोपही पाटकर यांनी केला आहे.

Smriti Irani IN Trouble

राजीनाम्याची मागणी - दरम्यान, काँग्रेसने या प्रकरणी स्मृती इराणी यांच्या राजीनामाची मागणी केली. शनिवारी संध्याकाळी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या कॅफे बाहेर आंदोलन करत इराणी यांचा पुतळ्याचे दहन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Smriti Irani IN Trouble
असे आले प्रकरण उजेडात - आसगाव येथील स्थानिक मृत व्यक्तीच्या नावे बारसाठी परवाना मागण्याचा अर्ज सादर झाला होता. याविषयीची माहिती सामाजिक कार्यकर्ते आयरिश रोद्रिगास यांनी माहिती हक्क कायद्याअंतर्गत मिळवली होती. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणात आयरिश यांनी अबकारी आयुक्तांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीला अनुसरून अबकारी आयुक्तांनी या बारला नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर हे प्रकरण फार समोर आले. त्याचा थेट संबंध भाजपच्या केंद्रीय महिला व बालकल्याण ण मंत्री स्मृती इराणीशी जोडल्या गेल्यामुळे याचा मोठा गाजावाजा झाला.
Smriti Irani IN Trouble

हेही वाचा -50 बंडखोर आमदारांना मनसेत प्रवेश देणार का? राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका

Last Updated : Jul 24, 2022, 9:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details