नागौर -केंद्रीय मंत्री डॉ. संजीव कुमार बाल्यान म्हणाले की, सोनिया गांधींच्या ईडीच्या चौकशीवरून काँग्रेस नेते जी आगपाखड करीत आहेत ती अनावश्यक आहे. सोनिया गांधी या काही देशाच्या कायद्याच्या वर नाहीत ( Sanjeev Balyan on Sonia Gandhi ). कोणी चुकीचे काम केल्यास कारवाई केली जाईल.
Balyan on Sonia Gandhi : सोनिया गांधी कायद्याच्या वर नाहीत, ईडीच्या चौकशीवरून मंत्री बाल्यान यांचा काँग्रेसला टोला - Sanjeev Balyan on Sonia Gandhi
सोनिया गांधी कायद्याच्या वर नाहीत. ईडीच्या चौकशीवरून काँग्रेस नेत्यांना एवढे चिडण्याचे कारण नाही. त्यांना कशाचा त्रास होत आहे. लोकशाहीत सर्वजण समान आहेत, केंद्रीय मंत्री डॉ. संजीव कुमार बाल्यान यांनी सोनिया गांधींच्या ( Sanjeev Balyan on Sonia Gandhi ) ईडीच्या चौकशीवरून उठलेल्या गदारोळावर वक्तव्य केले. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात त्यांनी हे वक्तव्य केले.
![Balyan on Sonia Gandhi : सोनिया गांधी कायद्याच्या वर नाहीत, ईडीच्या चौकशीवरून मंत्री बाल्यान यांचा काँग्रेसला टोला Balyan on Sonia Gandhi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15909328-thumbnail-3x2-balyan.jpg)
Balyan on Sonia Gandhi
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही
नागौर दौऱ्यावरआलेले बाल्यान म्हणाले की, सोनिया गांधींच्या चौकशीवरून काँग्रेसचे लोक गदारोळ का करत आहेत? जर तुम्ही चूक केली नसेल तर तुम्हाला तुम्हाला भीती कशाची वाटत आहे. एकतर सोनिया गांधी वेगळ्या आहेत असे म्हणा, त्या कायद्याच्या वर आहेत, असे तुम्हाला म्हणायचे आहे का. राजेशाही आता राहिलेली नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीत सर्व समान आहेत. कायदा आपले काम करील, चुकीचे असेल तर कारवाई केली जाईल, असे मंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.