पणजी -केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Union Minister of State Dr Bhagwat Karad) यांनी इंडिगो विमानात एका प्रवाशावर उपचार करून त्याचे प्राण वाचविले होते. त्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री कराड यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने खास चर्चा केली.
मंगळवारी दिल्लीहून मुंबईच्या दिशेने इंडिगो कंपनीचे फ्लाईट 171 (indigo 171 plane flight) उड्डाण करण्यासाठी झेपावले होते. प्रवासात एका रुग्णाला रात्री दोन वाजता रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. तेव्हा एअर होस्टेसने त्या रुग्णाच्या उपचारासाठी विमानातच कोणी डॉक्टर आहे का, अशी विचारणा केली. त्याचवेळी या विमानातून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr Bhagwat Karad) प्रवास करत होते. यावेळी त्यांनी पुढे येऊन त्या रुग्णावर उपचार करत त्याला जीवनदान दिले. (Dr Bhagwat Karad saved life of passenger in Plane) याच विषयावर बातचीत ईटीव्ही शी बातचीत करताना त्यांनी सांगितले की मी चाळीस वर्षे रुग्णसेवा केली आहे. मी आधी डॉक्टर व मगच मंत्री असल्याचेही त्यांनी सांगितले.