महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Nitin Gadkari Tested Corona Positive : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह खासदार तडस यांनाही कोरोनाची लागण - MP Ramdas Tadas Tested Covid Positive

राज्यासह देशभरातील राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह येत असताना आता केंद्रीय मंत्री नितीन यांनाही कोरोनाची लागण झाली ( Nitin Gadkari Tested Corona Positive ) आहे. त्यांनी स्वतः ट्विट ( Nitin Gadkari Tweet ) करून याबाबत माहिती दिली आहे.

नितीन गडकरी
नितीन गडकरी

By

Published : Jan 11, 2022, 11:32 PM IST

Updated : Jan 12, 2022, 12:18 AM IST

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाली ( Nitin Gadkari Tested Corona Positive )आहे. मंगळवारी रात्री त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ( Nitin Gadkari Tweet ) दिली. गडकरींनी ट्विटमध्ये लिहिले की, 'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत. मी सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करत आहे. मी स्वतःचे विलीगीकरण केले आहे आणि होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी चाचणी करून घ्यावी.

वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनाही कोरोनाची लागण

वर्धेचे खासदार रामदास तडस यांना कोरोनाची लागण ( MP Ramdas Tadas Tested Covid Positive ) झाली आहे. खासदार तडस हे दिल्लीत असून, मंगळवारी दुपारी त्यांना कोरीनाची लक्षणे दिसल्याने त्यांनी चाचणी केली. यात त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आहे. खासदार तडस यांनी स्वतःला डॉक्टरांच्या सल्यानुसार दिल्लीच्या निवासस्थानी क्वॉरंटाईन करून घेतले आहे. प्रकृती स्वस्थ असून, सौम्य लक्षणे असल्याची माहिती स्वतः खासदार तडस यांनी ट्विटर हँडलवरून दिली आहे.

Last Updated : Jan 12, 2022, 12:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details