ग्वाल्हेर(मध्य प्रदेश) -राज्यातील28 विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोट निवडणुकीचा प्रचार आज (दि. 1 नोव्हेंबर) थंडावला आहे. पोटनिवडणुकीत सर्वाधिक 16 जागा ग्वाल्हेर, चंबल अंचल येथील आहेत. या ठिकाणी भाजप पूर्ण ताकद लावत आहे. दरम्यान आज अंचल येथे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवने रोड शो करत भाजपला मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. यावेळी बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.
केंद्रीय मंत्री यांनी 'ईटीव्ही भारत'शी साधला संवाद
केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधत म्हटले की, आज (दि. 1 नोव्हेंबर) प्रचार-प्रसारासाठीचा अंतिम दिवस होता. यासाठी अंबाह विधानसभा मतदारसंघात रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या पोटनिवडणूकीत भाजपच्या सर्व जागा निश्चित निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजपाल यादव यांनी 'ईटीव्ही भारत'शी केली बातचित