महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Narayan Rane Targets Uddhav Thackeray : संजय राऊत मातोश्रीत पगारदार नोकर, उद्धव ठाकरेंना काही कळत नाही; नारायण राणेंचा प्रहार

Narayan Rane Targets Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. संजय राऊत हे मातोश्रीत पगारदार नोकर आहेत. उद्धव ठाकरे एकटेच असल्यामुळं संजय राऊत त्यांची काळजी घेतात, असा घाणाघात राणे यांनी ठाकरेंसह राऊत यांच्यावर केला आहे.

Narayan Rane Targets Uddhav Thackeray
Narayan Rane Targets Uddhav Thackeray

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 7:23 PM IST

इंदूर Narayan Rane Targets Uddhav Thackeray: मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य करण्याची एकही संधी न सोडणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज इंदूरमध्ये झालेल्या एमएसएमई परिषदेदरम्यान ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

उद्धव ठाकरेंना खोटं बोलण्याशिवाय काही कळत नाही : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा गट), संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांमुळं भाजपाला काही फरक पडणार नाही. संजय राऊत दैनिक सामनामध्ये फक्त पगारी नोकर होते. उद्धव ठाकरे यांना खोटे बोलणे, शिव्या देणे याशिवाय काहीच कळत नाही, असा प्रहार त्यांनी केलाय.

संजय राऊत फक्त पगारी नोकर : आज इंदूर येथे झालेल्या एमएसएमई कॉन्क्लेव्ह दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, शिवसेना आणि संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांमुळं भाजपाला काही फरक पडणार नाही. संजय राऊत सामना वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करायचे, संजय राऊत फक्त पगारी नोकर आहेत. ते आता उद्धव ठाकरेंची काळजी घेतात. उद्धव ठाकरे एकटेच असल्यामुळं त्यांची काळजी घ्यायला कोणी नाही, अशी टीका देखील राणे यांनी ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावर केलीय.

इंडिया आघाडी सत्तेसाठी लायक नाही : जेव्हा उद्धव ठाकरे यांना औषध-पाणी द्यायचं असतं, तेव्हा राऊत त्यांची काळजी घ्यायला जातात. मातोश्रीवर येणाऱ्या खोक्याबद्दल बोलताना नारायण राणे म्हणाले की, आता मातोश्रीवर फक्त रिकामी खोकी येतात. शरद पवार यांच्या इंडिया आघाडीत सामील होण्याबाबत ते म्हणाले की, शरद पवारांनीही साथ सोडली, तरी आम्हाला काही फरक पडत नाही. मात्र त्यांनी इंडिया आघाडीबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं. भारतात जमलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची युती देशाची प्रगती करण्यास लायक नसल्याचं राणे यांनी यावेळी बोलताना म्हटलंय.

हेही वाचा -

  1. MNS preparations for Lok Sabha : मनसेकडून लोकसभेची जोरदार तयारी, अमित ठाकरेंनी नाशिकच्या दौऱ्यात काय आखली रणनीती?
  2. Sharad Pawar Criticized PM : पंतप्रधानांच 'ते' विधान क्लेशदायक..शरद पवारांनी महिला आरक्षणाबाबत मांडली भूमिका
  3. Sanjay Raut On Pm Modi : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा पक्ष फुटलेला असेल, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details