महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Maharashtra Political Crisis : ....राष्ट्रवादीने सुरुवात केली; केंद्रीय मंत्र्यांची बंडानंतर प्रतिक्रिया - अनुराग ठाकूर राष्ट्रवादी बंडावर प्रतिक्रिया

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक पक्ष आमच्यासोबत येण्यास तयार असून याची सुरुवात राष्ट्रवादीने केली असल्याचे ते म्हणाले.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jul 4, 2023, 7:00 PM IST

कांगडा (हिमाचल प्रदेश) : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हिमाचल दौऱ्यावर कांगडा येथे आले होते. तेथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की अनेक राजकीय पक्षांना एनडीएचा भाग व्हायचे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी याचा फायदा होईल.

देशाच्या विकासासाठी अनेक राजकीय पक्ष एनडीएचा हिस्सा बनवण्यासाठी तयार आहेत. राष्ट्रवादीने याची सुरुवात केली आहे. यामुळे महाराष्ट्राला याचा फायदा होईल - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

राष्ट्रवादीने सुरुवात केली -देशाच्या विकासासाठी अनेक राजकीय पक्ष एनडीएचा हिस्सा बनवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. एनसीपीने याची सुरुवात केली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की एनसीपी एनडीएमध्ये आल्याने महाराष्ट्रातील विकासला फायदा होईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

जम्मू-काश्मिरात शांतता - कांगडा विमानतळावर पोहोचल्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी अनुराग ठाकूर म्हणाले की, 75 वर्षांनंतर जम्मू-काश्मीरला आपला हक्क मिळाला आहे. कलम 370 आणि 35A हटवणे हेच बरेच काही सांगून जाते. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता, विकास आणि बंधुभाव वाढला आहे. एवढेच नाही तर पर्यटकांची संख्याही अनेक पटींनी वाढली आहे.

पावसाळी अधिवेशनात UCC वर निर्णय? -ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना थांबल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दहशतवाद्यांवर कडक कारवाई केली जात आहे. पर्यटक आणि गुंतवणूकदार जम्मू-काश्मीरकडे वळत आहेत. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक कोणालाही नकोय. UCC वर अनुराग ठाकूर म्हणाले की, लवकरच पावसाळी अधिवेशन येत आहे. या अधिवेशनात UCC वर निर्णय होऊ शकतो.

हेही वाचा -Sharad Pawar Photo Permission : परवानगीशिवाय फोटो वापरू नका; शरद पवारांची थेट तंबी

ABOUT THE AUTHOR

...view details