महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

No Fake News : ..'त्या' वेब न्यूज पोर्टल्सवर आता कठोर कारवाई, मंत्री अनुराग ठाकूर यांचा इशारा - पाकिस्तानातून वापरले जाणारे २२ वेब पोर्टल बंद

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ( Information Broadcasting Department ) देशात सुरू असलेल्या वेब पोर्टल्सकडून ( Web News Portals In India ) त्यांची सविस्तर माहिती मागवली आहे. खोट्या बातम्या चालविणाऱ्यांविरुद्ध यापुढे कठोर कारवाई करण्यात ( Strict Action Against Web News Portals ) येईल, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ( Minister Anurag Thakur ) दिली आहे.

..'त्या' वेब न्यूज पोर्टल्सवर आता कठोर कारवाई, मंत्री ठाकूर यांचा इशारा
..'त्या' वेब न्यूज पोर्टल्सवर आता कठोर कारवाई, मंत्री ठाकूर यांचा इशारा

By

Published : Jan 9, 2022, 7:46 PM IST

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : केंद्रीय क्रीडा, युवक कल्याण आणि माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ( Minister Anurag Thakur ) ग्वाल्हेर दौऱ्यावर आले होते. तेथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, देशभरातील वेब पोर्टल ( Web News Portals In India ) चालविणाऱ्या लोकांना त्यांची सविस्तर माहिती ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला ( Information Broadcasting Department ) ऑनलाईन पद्धतीने द्यावी लागणार आहे. तसे निर्देशही देण्यात आले आहेत. यापुढे खोट्या बातम्या प्रसारित केल्यास वेब पोर्टल्सवर कारवाई करण्यात ( Strict Action Against Web News Portals ) येईल, असे ते म्हणाले.

'अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'

अनुराग ठाकूर ग्वाल्हेरमध्ये ( Anurag Thakur in Gwalior) लक्ष्मीबाई फिजिकल युनिव्हर्सिटीची ( Lakshmibai Physical University ) पाहणी करण्यासाठी आले होते. येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, वेब पोर्टल्सना देशामध्ये बनावट बातम्या चालविण्यास परवानगी दिली जाणार नाही. जर कोणत्याही वेब पोर्टलने भीती, गोंधळ किंवा अफवा पसरवल्या किंवा देश तोडण्याचा प्रयत्न केला, तर माहिती आणि प्रसारण मंत्रालय त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. देशात सुरू असलेल्या वेब पोर्टलकडून त्यांची माहिती मागवण्यात आली आहे. ती माहिती ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला ऑनलाइन पद्धतीने द्यावी लागेल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पाकिस्तानमधून कार्यरत होत असलेले एकूण 22 वेब पोर्टल आणि चॅनल बंद ( Action Against Web Portals Of Pakistan ) केले आहेत. भविष्यात कोणी देश तोडण्याचा अजेंडा चालवला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

भाजपचा विजय होणार

मंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ( 5 State Assembly Election ) भाजपच्या विजयाचा दावा केला आहे. अनुराग ठाकूर म्हणाले की, निवडणुकांसाठी भाजप पूर्णपणे तयार आहे. निवडणुकीत पुन्हा एकदा आम्ही कमळ फुलवू. मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने देशात सरकार स्थापन झाले आहे, त्याच पद्धतीने आम्ही पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करू, असा दावा त्यांनी यावेळी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details