हैदराबाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज तेलंगणाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आज दुपारी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीला भेट दिली आणि संस्थापक रामोजी राव यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बराच काळ चर्चा झाली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर होते. ते मुनुगोडू येथील भाजपच्या सभेत सहभागी झाले. दिल्लीहून बेगमपेट विमानतळावर पोहोचलेल्या अमित शाह यांचे केंद्रीय मंत्री किशन रेड्डी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय, पक्षाचे राज्य कार्य प्रभारी तरुण चुग, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रेमेंद्र आणि इतरांनी जोरदार स्वागत केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रामोजी फिल्म्स सिटीत घेतली रामोजी राव यांची भेट अमित शाह दुपारी सिकंदराबाद येथील महांकाली मंदिरात Amit Shah In Mahankali Temple पोहोचले. अमित शाह यांचे मंदिराच्या पुजाऱ्यांनी स्वागत केले. अमित शाह यांनी देवीची विशेष पूजा केली. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंदिरात कडक बंदोबस्त ठेवला होता. कोणीही प्रवेश करू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रामोजी फिल्म्स सिटीत घेतली रामोजी राव यांची भेट महाकाली मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अमित शाह सिकंदराबाद येथील संभामूर्तीनगर येथील भाजप कार्यकर्ते सत्यनारायण यांच्या घरी Amit shah Visited BJP Activists House गेले. सत्यनारायण यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत केले. अमित शाह यांचे आगमन होताच कार्यकर्ते सत्यनारायण यांच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रामोजी फिल्म्स सिटीत घेतली रामोजी राव यांची भेट सत्यनारायणच्या घरी अर्धा तास घालवल्यानंतर अमित शाह रमादा मनोहर हॉटेलमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी शेतकरी नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर 4.10 वाजता बेगमपेट विमानतळावर पोहोचले आणि तेथून विशेष हेलिकॉप्टरने 4.30 वाजता मुनुगोडा येथे रवाना झाले. मुनुगोडू येथे दुपारी 4.40 ते 4.55 या वेळेत सीआरपीएफ अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. त्यानंतर शाह यांनी रामोजी राव यांची भेट घेतली आहे. Union Home Minister Amit Shah visits Ramoji Film City in Hyderabad and meets founder Ramoji Rao
हेही वाचाRamoji Film City दक्षिण कोरियाच्या राजदूतांनी दिली रामोजी फिल्म सिटीला भेट