हैदराबाद (तेलंगणा ) -केंद्रीय मंत्री अमित शाह 17 सप्टेंबर रोजी येथे 'हैदराबाद लिबरेशन डे' सोहळ्याचे उद्घाटन ( Amit Shah To Attend Hyderabad Liberation Day ) करतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला उपस्थित राहतील. 17 सप्टेंबर रोजी शहरातील परेड ग्राऊंडवर केंद्र सरकारतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला शाह ( Union Home Minister Amit Shah ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तेलंगणात होणार्या विधानसभा निवडणुका तसेच 2024 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप जोरदार तयारी करत असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीच्या गणितांबाबत शहा यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ( Union Home Minister Amit Shah To Attend Hyderabad Liberation Day Celebrations On September 17 )
Hyderabad Liberation Day 2022 : 75 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती; 'हैदराबाद मुक्ती दिन' सोहळ्याला अमित शाह राहणार उपस्थित - Amit Shah To Attend Hyderabad Liberation Day
17 सप्टेंबर रोजी 'हैदराबाद लिबरेशन डे' ( Hyderabad Liberation Day 2022 ) सोहळ्याचे उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह ( Amit Shah To Attend Hyderabad Liberation Day ) येत आहेत. शहरातील परेड ग्राऊंडवर हा कार्यक्रम होणार असून, शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.( Union Home Minister Amit Shah To Attend Hyderabad Liberation Day Celebrations On September 17 )
75 वर्षांनंतर माननीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रध्वज फडकावतील - केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी ट्विट केले की, “1948 मध्ये हैदराबाद संघात विलीन झाल्यानंतर सरदार पटेल यांनी तिरंगा फडकवला. आता 75 वर्षांनंतर माननीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रध्वज फडकावतील आणि हैदराबाद मुक्ति दिन सोहळ्याला सुरुवात करतील. त्याचबरोबर केंद्रीय मंत्र्यांनी याबाबतचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
सिकंदराबाद येथे मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी - लिबरेशन डे कार्यक्रमानंतर शाह तेलंगणातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतील, असे पक्षाच्या एका प्रसिद्धीपत्रकात गुरुवारी म्हटले आहे. त्यानंतर शाह सिकंदराबाद येथे मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होतील, असे त्यात म्हटले आहे. अलीकडेच, केंद्र सरकारने 'हैदराबाद राज्य मुक्ती'ची ७५ वर्षे पूर्ण करण्यासाठी वर्षभर उत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला. 17 सप्टेंबर 1948 रोजी 'ऑपरेशन पोलो' नावाच्या लष्करी कारवाईनंतर निजामाच्या अधिपत्याखाली असलेले हैदराबाद राज्य भारताशी जोडले गेले.