तेजपूर :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चार दिवसांच्या दौऱ्यावर सोमवारी रात्री मणिपूरला पोहोचले. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी शाह यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर सोमवारी अमित शहा यांनी मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांची भेट घेतली. त्यानंतर शाह यांनी मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री, वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. यादरम्यान, गृहमंत्र्यांनी राज्यात सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी रणनीती ठरवली आहे. मणिपूरमध्ये 1 जूनपर्यंतच्या वास्तव्यादरम्यान गृहमंत्री सुरक्षा बैठकांच्या अनेक फेऱ्या घेतील. यासोबतच शांतता प्रस्थापित करण्याबाबत शाह विविध लोकांशी चर्चा करणार आहेत.
मणिपूर पोलिस अधिकाऱ्यासह पाच जणांची हत्या : भाजप आमदाराच्या घराची तोडफोड तसेच मणिपूर रायफल्स, आयआरबीच्या शस्त्रागारातून जमावाने कथित एक हजाराहून अधिक शस्त्रे, दारूगोळा लुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे. राज्याच्या चार दिवसांच्या दौऱ्यात पहिल्या दिवशी शाह यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, गुप्तचर विभागाचे प्रमुख तपन डेका यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
200 घरे जाळली : सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम इंफाळच्या कडंगबंद, सिंगडा भागात संशयित कुकी दहशतवादी, सुरक्षा कर्मचारी यांच्यात भीषण चकमक सुरू आहे. मणिपूरच्या पायथ्याशी नागरिकांवर हल्ले करण्याबरोबरच, शनिवारी रात्री उशिरा काकचिंग जिल्ह्यातील सुगनूजवळील तीन गावांमध्ये अतिरेक्यांनी 200 हून अधिक घरे जाळल्याची घटना घडली आहे.