पाटणा (बिहार) : 2024 च्या लोकसभा निवडणुकीला जवळपास 14 महिने बाकी आहेत. अशा स्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बिहार दौऱ्यावरून राज्यातील भाजपच्या सक्रियतेचा अंदाज येऊ शकतो. गेल्या 6 महिन्यात अमित शाह आज तिसऱ्यांदा बिहारमध्ये जाणार आहेत. आपल्या बिहार दौऱ्यात शाह वाल्मिकी नगरमध्ये कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देतील, तर पाटण्यात स्वामी सहजानंद सरस्वती जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाध साधतील, असे मानले जात आहे.
अमित शाहंच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बिहार दौऱ्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तर भाजपमध्ये लहान पक्षांची वाढती जवळीक पाहून भाजपही समाधानी आहे. काही दिवसांपूर्वी दरभंगा येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार आता भविष्यात कधीही भाजपसोबत येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बिहार मिशनवर अमित शाह :अशा परिस्थितीत भाजप छोट्या पक्षांना एकत्र आणण्याच्या रणनीतीवर सध्या काम करत आहे. त्याचवेळी अनेक छोट्या पक्षांवर सहज विश्वास ठेवता येणार नाही, असेही भाजपचे मत आहे. अशा स्थितीत सर्व जागांवर लढण्याची भाजपची तयारी सुरू आहे. खासकरून जेडीयूच्या ताब्यात असलेल्या जागांवर भाजपची नजर आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजप एकत्र लढले होते.