भाजपाने गोव्यात विकास केला. गांधी कुटुंबासाठी गोवा हे फक्त सुट्टीचे ठिकाण आहे. आम्ही राज्याचा अर्थसंकल्प 432 कोटी (2013-14) वरून 2,567 कोटी (वर्ष 2021) पर्यंत वाढवला आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पायाभूत सुविधांच्या विकासावर काहीही केले नव्हते. जे वचन दिले होते ते आम्ही पूर्ण केले, असे अमित शाह म्हणाले.
Amit Shah in Goa : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गोव्यात दाखल, भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी घेणार तीन सभा - गोवा विधानसभान निवडणूक
19:20 January 30
घरोघरी प्रचारातही अमित शाह सहभागी
16:44 January 30
गांधी कुटुंबासाठी गोवा हे फक्त सुट्टीचे ठिकाण, अमित शाह यांची टीका
15:49 January 30
अमित शाह यांनी बोरीम येथील साईबाबा मंदिरात प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते.
15:29 January 30
Amit Shah in Goa : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गोव्यात दाखल, भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी घेणार तीन सभा
गोवा - गोव्यात विधानसभा निवडणुकीची ( Goa Assembly Election 2022 ) रणधुमाळी सुरु झाली असून भाजपाच्या प्रचारासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amil Shah Goa Tour ) मैदानात उतरणार आहेत. दुपारी दोन वाजता त्यांचं गोव्यात आगमन झालं. यानंतर ते भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी तीन सभा घेणार आहेत. याशिवाय घरोघरी प्रचारातही ते सहभागी होणार आहेत.
अमित शाह यांच्या ( Amit Shah In Goa ) गोवा दौऱ्यानिमित्त कोरोना नियमाचे पालन करुन निवडक कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल. यानिमित्ताने राज्यांतील विविध भागात स्क्रीन उभारून सभागृह, खुल्या मैदानांत त्यांच्या सभांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, बालकल्याण मंत्री स्मृती इराणी आणि अन्य नेते गोव्यात सभा घेणार आहेत.
गोवा विधानसभा -
गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election 2022) जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षानं कंबर कसली आहे. गोवा विधानसभा निवडणूक ही 14 फेब्रुवारीला होणार आहे. गोवा विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपणार आहे. गोवा विधानसभेसाठी एकूण 40 जागा आहे. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आहे.