महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Amit Shah On Medha Patakar : गुजरातच्या राजकारणात मेधा पाटकरांची एन्ट्री? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Union Home Minister Amit Shah यांनी रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Chief Minister Arvind Kejriwal यांच्यावर निशाणा Amit Shah criticizes Arvind Kejriwal साधला. मेधा पाटकर यांना मागच्या दाराने गुजरातच्या राजकारणात आणण्यासाठी काही लोक प्रयत्नशिल असल्याचा आरोप शाह यांनी केला.

Amit Shah On Medha Patakar
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

By

Published : Sep 5, 2022, 9:03 AM IST

अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Union Home Minister Amit Shah यांनी रविवारी आम आदमी पार्टीचे Aam Aadmi Party राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा Amit Shah criticizes Arvind Kejriwal साधला. काही लोक मागच्या दरवाजाने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना गुजरातच्या राजकारणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याची जीवनवाहिनी असलेल्या नर्मदा प्रकल्पाला मेधा पाटकर यांनी विरोध केला होता. AAP ने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या ईशान्य मतदारसंघातून नर्मदा बचाव आंदोलनाचे Narmada Rescue Movement मेधा पाटकर यांना उमेदवारी दिली होती.

मेधा पाटकर यांना मागच्या दाराने गुजरातच्या राजकारणात प्रवेश -पुढे बोलतांना शाहा म्हणाले, 'नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मेधा पाटकरांना गुजरातच्या राजकारणात प्रवेश मिळवून देण्यासाठी काही लोकांनी आज नवी सुरुवात केली आहे. मला गुजरातच्या तरुणांना विचारायचे आहे की, गुजरातच्या विकासाला विरोध करणाऱ्यांना तुम्ही राज्यात येऊ देणार का? विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या 36th National Games Ahmedabad उद्घाटन समारंभात शाह बोलत होते.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातचा विकास -राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने गेल्या 20 वर्षात विविध क्षेत्रात विकास केला आहे. असे मानदंड प्रस्थापित केले आहेत जे कदाचित येत्या काही दशकात मोडता येणार नाहीत. मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये रस्ते, बंदरे यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला आहे, 24 तास वीजपुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. कायदा आणी सुव्यास्था गुजरातमध्ये मजबूत असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा -Today Top News : राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

ABOUT THE AUTHOR

...view details