नवी दिल्ली -कोविड-19 संसर्ग नियंत्रणासाठी मुंबईने अमलात आणलेले विकेंद्रीकरणाचे मॉडेल देशपातळीवर राबवण्याची गरज केंद्रीय आरोग्य विभागाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी व्यक्त केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नागरिकांना संपर्क साधता यावा, त्यांच्या अडचणी सांगता याव्यात, यासठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते. मात्र, ते महापालिका पातळीवर नाही, तर वॉर्ड पातळीवर मुंबईत तयार करण्यात आले होते. 24 वॉर्डासाठी प्रत्येकी एक असे 24 नियंत्रण कक्ष स्थापण्यात आले होते. मुंबई महापालिकेकडे जे रुग्ण चाचणीचे रिझल्ट येतात. ते संबंधित वॉर्डातील नियंत्रण कक्षात पाठवले जातात. हे कक्ष केंद्र म्हणून काम करत आणि त्यानुसार प्रत्येक वॉर्डात रुग्णसंख्या कमी करण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक वॉर्डरूम मध्ये 30 दूरध्वनी लाईन्स आहेत. त्या सांभाळण्यासाठी 10 फोन ऑपरेटर्स, 10 डॉक्टर्स आणि 10 रुग्णवाहिका होत्या. तसेच, खाटांची उपलब्धता सांगणारे 10 डॅशबोर्डदेखील या कक्षांमध्ये लावण्यात आले. या सर्व प्रयत्नांमुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लोकांना काहीही त्रास झाला नाही, अशी महिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
हेही वाचा-कोरोना लशीचा फॉर्म्यूला सार्वजनिक करावा; अरविंद केजरीवाल यांची केंद्राला विनंती
रुग्णांना बेड मिळण्यात काहीही अडचण येऊ नये, म्हणून मुंबई पालिकेचे योजनाबद्ध प्रयत्न
800 एसयूव्ही गाड्या तात्पुरत्या रुग्णवाहिका म्हणून रुपांतरीत करण्यात आल्या होता. या सर्व रुग्णवाहिकांचा माग काढत त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एक सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करण्यात आला. या सर्व व्यवस्था समन्वय राखून योग्यप्रकारे काम करत आहेत. जेणेकरुन रुग्णांना बेड मिळण्यात काहीही अडचण येऊ नये, असे सांगत, अग्रवाल यांनी मुंबई महानगरपालिकेच्या या योजनाबद्ध प्रयत्नांचे कौतुक आरोग्य विभागाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी केले.