नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचा म केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला सादर करणार आहेत. दरवर्षी पंरपरेप्रमाणे होणारा हलवा सोहळा शनिवारी पार पडला. अर्थसंकल्प तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सूचक हा हलवा सोहळा असतो.
यंदा अर्थसंकल्प हा १ फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाची छपाई होणार नाही. यंदाचा अर्थसंकल्प प्रथमच कागदविरहीत स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एका मोबाइल अॅपचं उद्घाटन केलं आहे. अर्थसंकल्पाशी संबधित सर्व घटक या अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अर्थमंत्र्यांचं 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर मोबाइल अॅपवर याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
दोन टप्प्यात होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन -