नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Union budget of India) आज केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण (union minister nirmala sitharaman) यांनी 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यात रेल्वे क्षेत्रासाठीही मोठ्या घोषणा केल्या.या अंतर्गत 400 नवीन 'वंदे भारत' गाड्या (400 new 'Vande Bharat' train) सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लहान शेतकरी लहान आणि मध्यम उद्योगासाठी सेवा देणार असल्याचेही म्हणले आहे.
सोमवारी निर्मला सीतारमण यांनी आर्थित सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर केले. त्यात 9.2 टक्के विकास दराचा अंदाज लावला होता. 2022-23 मधे जीडीपी 8.0 - 8.5 टक्के विकसित होईल, एप्रिल - नोव्हेंबर 2021 दरम्यानच्या कालावधित 13.5 टक्याची वाढ झाल्याचे म्हणले आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत विदेशी मुद्रा भंडार 633.6 बिलियन डाॅलरच्या स्तरावर पोचल्याचे म्हणले आहे.