महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा दरात घसरण, सीएमआयईच्या आकडेवारीतून माहिती आली समोर - Report of Center For Monitoring of Indian Economy

सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात ( Report of Center For Monitoring of Indian Economy ) असे म्हटले आहे की, सप्टेंबर महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर 6.43 टक्क्यांवर आला आहे. सर्वाधिक 23.8 टक्के बेरोजगारीचा दर ( Unemployment Rate has Decreased Significantly ) राजस्थानमध्ये होता, तर सर्वात कमी 0.1 टक्के छत्तीसगडमध्ये होता. ऑगस्टमध्ये बेरोजगारीचा दर ८.३ टक्के होता.

Unemployment Rate has Decreased
सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 6.43 टक्क्यांवर

By

Published : Oct 2, 2022, 2:00 PM IST

मुंबई :देशातील ग्रामीण आणि शहरी भागात ( Report of Center For Monitoring of Indian Economy ) कामगार सहभाग वाढल्याने सप्टेंबर महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर 6.43 टक्क्यांवर आला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी (CMIE) ( CMIE Managing Director Mahesh Vyas ) या अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या ( Unemployment Rate in India ) संस्थेने ही माहिती दिली आहे. CMIE (सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी) ने सप्टेंबर 2022 साठी रोजगार डेटा जारी केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये बेरोजगारीचा दर 8.3 टक्क्यांच्या एका वर्षातील उच्चांकावर पोहोचला आहे. परंतु, सप्टेंबर महिन्यात रोजगाराच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे बेरोजगारीचा आकडा 6.43 टक्क्यांवर आला आहे.

बेरोजगारीच्या दरात लक्षणीय घट झाली : CMIE सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास म्हणाले, “सप्टेंबरमध्ये बेरोजगारीच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. शहरी भागाव्यतिरिक्त ग्रामीण भागातही कामगारांचा सहभाग वाढल्याने हे घडले आहे. व्यास म्हणाले की, सप्टेंबरमध्ये कामगार सहभागामध्ये 8 दशलक्षने झालेली वाढ हे देशाची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करीत असल्याचे द्योतक आहे. CMIE च्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर एका महिन्यापूर्वी 7.68 टक्क्यांवरून 5.84 टक्क्यांवर आला आहे. तर शहरी भागात ते 7.70 टक्के होते. जे ऑगस्टमध्ये 9.57 टक्के होते.

राजस्थानमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक : सप्टेंबरमध्ये, राजस्थानमध्ये 23.8 टक्के बेरोजगारीचा दर सर्वाधिक होता. तर तो जम्मू-काश्मीरमध्ये 23.2 टक्के, हरियाणामध्ये 22.9 टक्के, त्रिपुरामध्ये 17 टक्के असा आढळून आला. झारखंडमध्ये 12.2 टक्के आणि बिहारमध्ये 11.4 टक्के होते. त्याच वेळी, सर्वात कमी बेरोजगारीचा दर छत्तीसगडमध्ये होता. जिथे केवळ 0.1 टक्के बेरोजगारीचा अंदाज होता. आसाममध्ये बेरोजगारीचा दर ०.४ टक्के आहे.

देशातील इतर राज्यांमध्ये असलेला बेरोजगारीचा दर : उत्तराखंडमध्ये ०.५ टक्के, मध्य प्रदेशमध्ये ०.९ टक्के, गुजरातमध्ये १.६ टक्के, मेघालयमध्ये २.३ टक्के आणि ओडिशामध्ये २.९ टक्के होता. कमी पावसामुळे ऑगस्टमध्ये बेरोजगारीचा दर ८.३ टक्क्यांच्या एका वर्षातील उच्चांकावर पोहोचला होता. ऑगस्टमध्ये शहरी बेरोजगारीचा दर ९.६ टक्के तर ग्रामीण बेरोजगारीचा दर ७.७ टक्के होता.

ABOUT THE AUTHOR

...view details