भागलपूर/सुलतानगंज ( बिहार ) :भागलपूरच्या सुलतानगंजमध्ये बांधकाम सुरु असलेला अगुवानी पूल किरकोळ वादळालाही तग धरू शकला ( under construction bridge collapsed in sultanganj ) नाही. सुमारे 1,710 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा पूल शुक्रवारी कोसळला. या अपघातात जीवित व वित्तहानी झाली नसली तरी, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुलाचा भाग कोसळत असताना तेथे लोकं नसल्याने अनेकांचे प्राण वाचले ( Bridge Collapsed In Bihar ) आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार ललित नारायण मंडल, मंडळ अधिकारी शंभूशरण राय आणि ब्लॉक विकास अधिकारी मनोज कुमार मुर्मू घटनास्थळी पोहोचले.
आमदाराने केला भ्रष्टाचाराचा आरोप : घटनास्थळी पोहोचलेले जेडीयूचे आमदार ललित नारायण मंडल यांनी या पुलाच्या बांधकामाबाबत खळबळजनक आरोप केले आहेत. पुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आगवणी पुलाच्या बांधकामाचा दर्जा खराब आहे. तुरळक वादळ आणि पावसात पुलाचा ढाचा ढासळणे हा भ्रष्टाचाराचा परिणाम आहे. आगवणी पुलाची पाहणी यापूर्वी करून त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बांधकाम करताना दर्जाची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते.
या अपघाताची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे. पुलाचे बांधकाम सुरू असताना झालेल्या गडबडीमुळे हा अपघात झाला. या पुलाच्या पडझडीला कोण जबाबदार आहे, याचा तपास करून शोध घेण्याची गरज आहे. -जेडीयू आमदार ललित नारायण मंडल