महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये दुर्गा विसर्जनादरम्यान कारने भाविकांना चिरडले; 1 ठार, 20 जखमी... पाहा VIDEO

जशपूरमध्ये शुक्रवारी दसऱयाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांना एका भरधाव कारने चिरडल्याची घटना घडली आहे. यात जवळपास 20 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर तेथील संतप्त नागरिकांनी कारचा पाठलाग करून तिला थांबवण्यात आले. यावेळी चालक फरार झाला होता. ही कार गांजाने पूर्ण भरलेली होती.

accident
अपघात घटना

By

Published : Oct 16, 2021, 12:07 AM IST

जशपूर(छत्तीसगड) - जशपूरमध्ये शुक्रवारी दसऱयाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांना एका भरधाव कारने चिरडल्याची घटना घडली आहे. यात जवळपास 20 जण जखमी झाले असून, प्रशासनाच्या माहितीनुसार यात एकाचा मृत्यू झाला आहे. पण, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जखमींना पत्थलगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जशपूर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये कारने अक्षरक्षा भाविकांना चिरडले.

घटनेचा व्हिडिओ
  • प्रशासनाकडून मृतांचा आकडा लपवला जातोय?

जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडे प्रशासन लपवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

घटनेचा व्हिडिओ
  • कार गांजाने भरलेली -

घटनेनंतर तेथील संतप्त नागरिकांनी कारचा पाठलाग करून तिला थांबवण्यात आले. यावेळी चालक फरार झाला होता. ही कार गांजाने पूर्ण भरलेली होती. घटनास्थळी तणावाचे वातावरण झाले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर नागरिकांनी पत्थलगाव पोलीस ठाण्याला घेराव घालून आंदोलन केले. आंदोलनावेळी पोलीस आणि काही माध्यम प्रतिनिधींनाही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

  • आरोपींना अटक
    पोलीस अधिकारी

अपघाताच्या घटनेतील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. बबलू विश्वकर्मा (वय २१) आणि शिशुपाल साहू (वय २६) असे त्यांची नावे आहेत. दोघेही मध्य प्रदेशचे रहिवासी असून, छत्तीसगडमधून ते जात होते. पोलीस पुडील तपास करत आहेत.

  • मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त -
    मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जशपूर येथील घटनेवर ट्विट करून तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे की, 'जशपूरमधील घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. दोषींना तत्काळ अटक करण्यात आली आहे. दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही प्रथमदर्शनी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा -नवहिंदूंपासूनच हिंदूत्वाला धोका; मुख्यमंत्र्यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघासह केंद्रावर सोडले टिकास्त्र

ABOUT THE AUTHOR

...view details