शिवमोग्गा (कर्नाटक)-देशभरात कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळची माणसे गमावली आहेत. कित्येकांनी तर नकळत्या वयात आपल्या आईला गमावले आहे. अशीच एक मनाला चटका लावून जाणारी घटना पुढे आली आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा येथिल एक तीन वर्षाची मुलगी दररोज आपल्या वडिलांना फोन करते. मात्र, तिच्या वडिलांचा एका महिन्यापूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे तिला माहिती नाही. मात्र, ती दररोज आपल्या वडिलांना तितक्याच निरागसतेने फोन करत आहे. हे दृश्य पाहून परिवारातील इतर सदस्यांचाही अश्रुंचा बांध फुटतो.
कोरोनामुळे वडिलांचे निधन झाल्याने अनाथ झालेली चिमूकली १ वर्षापूर्वी आईला गमावले
या मुलीचे नाव सम्या असे आहे. ती आता तीन वर्षांची आहे. सम्या ही शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील होसाकोप्पा येथिल रहिवासी असलेल्या शरणची मुलगी आहे. 1 वर्षाची असतानांच तिच्या आईचा मृत्यू झाला. तेव्हापासून शरणने सम्याची जबाबदारी घेतली होती. परंतू आता कोविडमुळे तिने वडीलही गमावले आहे.
शरणने कोरोनाबाबत केली होती जनजागृती
शरण हा बंगळुरूमधील एका खासगी कंपनीत नोकरी होता. पहिल्या लॉकडाऊनमुळे त्यांना बंगळुरु सोडावे लागले आणि शिवमोग्गा येथे परत आले. काही दिवसात त्यांना शिवमोग्ग्यामध्ये नोकरी मिळाली. नोकरी व्यतिरिक्त त्यांनी संस्कृती फाऊंडेशन सुरू केले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील कोरोना रुग्णांना मदत पोहचविण्याचे काम केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही शरणने कोरोनाबद्दल जनजागृती केली. त्याच्या या कार्याचा सर्वत्र कौतुक झाला. त्याने सुमारे 10 हजार लोकांना एन -95 मास्क, सॅनिटायझर आणि किराणा किटचे वाटप केले. अशात कोरोना वॉरियर म्हणून कार्यरत असलेल्या शरणला एका महिन्यापूर्वी संसर्ग झाला होता. याच काळात त्याचा मृत्यू झाला. आता सम्या आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ झाली आहे.
'ति' दररोज करते फोन
दोन वर्षापूर्वी सम्याच्या आईचा मृत्यू झाल्यापासून सम्याचा सांभाळ शरणची बहिण अखिला करत आहे. सम्याला वाटते की अखिलाच आपली आहे. त्यामुळे ती अखिलाकडे चांगलीच रमली आहे. सगळ्यात हृदयस्पर्शी म्हणजे सम्या दररोज दिवसातून ४ ते ५ वेळा आपल्या वडिलांना फोन करते. मात्र, तिला वडिलांच्या निधनाबाबत अजूनही कळले नाही. ती आजही वडिलांच्या प्रतीक्षेत तितक्याच निरागसतेने फोन करते.