हैदराबाद - लाच प्रकरणी अटकेत असलेल्या पोलीस निरीक्षकाच्या बँक लॉकरकडून तेलंगणा पोलिसांनी बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) 34 लाख 40 हजार 200 लाख रुपयांची रोकड आणि 9.13 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. तक्रारदाराकडून लाच मागितल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दााखल करण्यात आला आहे.
निजामाबाद येथील कांटेश्वर शाखेच्या अॅक्सिस बँकेमध्ये आरोपी असलेले कामरेड्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंदूर जगदीश व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या लॉकरमधून पोलिसांनी 32 लाख 40 हजार 200 रुपये रोख रक्कम 182.56 ग्रॅम सोने व 157 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली असून संपत्तीचे काही कागपत्रेही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी केले आहेत.