महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फादर स्टॅन यांच्या मृत्यूनंतर संयुक्त राष्ट्राने भारत सरकारला 'ही' केली विनंती - political prisoners

आम्ही मानवी हक्काचे संरक्षणक आणि जीस्ट प्रीस्ट असलेल्या 48 वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूने खूप दु:खी आणि व्यथित झालो आहोत. त्यांना युएपीए कायद्यान्वये ऑक्टोबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती, युएनच्या मानवी हक्क आयोगाच्या उच्चायुक्तांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

फादर स्टॅन
फादर स्टॅन

By

Published : Jul 6, 2021, 7:26 PM IST

Updated : Jul 6, 2021, 7:53 PM IST

हैदराबाद - आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर संयुक्त राष्ट्रसंघ मानवी हक्क आयोगाने दु:ख व्यक्त केले आहे. पुरेशा कायदेशीर पुराव्याअभावी अटक केलेल्या कैद्यांची मुक्तता करावी, असे आवाहन मानवी हक्क आयोगाने भारत सरकारला केले आहे.

आम्ही मानवी हक्काचे संरक्षणक आणि जीस्ट प्रीस्ट असलेल्या 48 वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूने खूप दु:खी आणि व्यथित झालो आहोत. त्यांना युएपीए कायद्यान्वये ऑक्टोबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती, युएनच्या मानवी हक्क आयोगाच्या उच्चायुक्तांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. कोरोनाचा फटका बसत असताना राज्य सरकारासह भारत सरकारने पुरेसा पुरावा नसलेल्या प्रत्येक व्यक्तीला कैदेतून मुक्त करावे, असे युएनच्या मानवी हक्क आयोगाने म्हटले आहे. मानवी अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य यांचा संकोच न करताना कोणालाही केंद्र सरकारने अटक करू नये, असे आवाहनही उच्चायुक्तांनी केले आहे.

हेही वाचा-तक्रार निवारण अधिकारी कधी नेमणार याची माहिती द्या, उच्च न्यायालयाचे ट्विटरला आदेश

फादर स्टेन स्वामी यांचा वांद्यातील रुग्णालयात मृत्यू झाला. मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या कोरगाव भीमा खटल्यात जामिन मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांना एनआयएने 2018 मध्ये कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर अटक केली होती. फादर स्टेन यांच्यावर खटला न चालविता त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना जामिनही मिळाला नव्हता. त्यांच्यावर दहशतवाद्यांशी संदर्भात गुन्हे दाखल केले होते. त्यांना तळोजामध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची लागण झाली असतानाही वारंवार जामीन फेटाळण्यात आला होता. जामिनाच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालय विचार करत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, विरोधी पक्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्र लिहून कोरेगाव भीमा प्रकरणातील सर्व आरोपींना राजकीय प्रेरणेने दाखल झालेल्या गुन्ह्यातून मुक्त करावे, अशी मागणी केली आहे. या पत्रात विरोधी पक्षांनी फादर स्टॅन यांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना लिहिले पत्र

हेही वाचा-कोण होते फादर स्टॅन स्वामी, जाणून घ्या

कोण होते फादर स्टॅन स्वामी?

फादर स्टॅन हे झारखंडमधील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते होते. आदिवासींसाठी काम करणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. ते गेल्या अनेक वर्षांपासून वंचित घटकांसाठी कार्य करीत होते. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गेल्या वर्षी 9 ऑक्टोबरला त्यांना रांची येथून अटक करण्यात आली होती. कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये सहभागी झाल्याचा त्यांच्यावर आरोप होता. राष्ट्रीय तपास संस्थेने नामकुम स्टेशन हद्दीत असलेल्या निवासस्थानातून फादर स्टॅन यांना ताब्यात घेतले होते. जवळपास 20 मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ते पार्किन्सन आजाराने ग्रस्त होते. त्यांची श्रवणशक्ती कमी झाली होती. तसेच लंबर स्पॉन्डिलायसिसमुळे ते त्रासलेले होते.

हेही वाचा-माध्यमांच्या स्वातंत्र्याची शिकार करणारे ३७ जागतिक नेते; पंतप्रधान मोदींचाही समावेश

एल्गार परिषदेनंतर करण्यात आली होती कारवाई-

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) फादर स्टेन यांना रांचीवरून ऑक्टोबर 2020 मध्ये अटक केली होती. त्यावेळेस त्यांना तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेत दिलेल्या भाषणा प्रकरणी अटक करण्यात आली होती. एनआयएनने स्टेन यांच्या विरोधात यूएपीए (UAPA) अंतर्गत कारवाई केली होती. एल्गार परिषदेच्या या कार्यक्रमानंतर भीमा कोरेगाव येथे प्रचंड हिंसा झाली होती. या हिंसेमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात यामध्ये माओवादी कनेक्शन असल्याचे म्हटले होते.

Last Updated : Jul 6, 2021, 7:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details