महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Umesh Pal Murder Case : ..म्हणून अतिक अहमदने केली उमेश पाल यांची हत्या, पोलीस तपासात 'हे' सत्य आले समोर - अश्रफ अहमद

उमेश पाल हत्याकांडाच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांनी या प्रकरणी एक मोठा खुलासा केला आहे. अतिक अहमदने हत्येपूर्वी उमेश पाल यांना फोनवरून धमकी दिली होती. मात्र त्यांनी धमकीला भीक न घातल्याने अतीक अहमदच्या सांगण्यावरून मुलगा असदने अश्रफ अहमदच्या मदतीने उमेश पाल यांची हत्या घडवून आणली.

Atiq Ahmed
अतिक अहमद

By

Published : May 7, 2023, 4:55 PM IST

प्रयागराज :उमेश पाल यांच्या हत्येपूर्वी अतिक अहमदने त्यांना फोनवरून धमकी दिल्याचे समोर आले आहे. मात्र धमकीला घाबरण्याऐवजी उमेश पालने अतिक अहमदशी फोनवर जोरदार वाद घातला होता. नेहमी फोन करून शिवीगाळ आणि धमकावणाऱ्या अतीकला उलट उत्तर मिळाल्याने तो वैतागला. अतिक अहमदने उमेश पाल यांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली होती. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल आणि त्यांच्या दोन बंदूकधारी जवानांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

अतीकने उमेश पालला फोनवरून धमकी दिली : बॉम्बर गुड्डू मुस्लिम हा उमेश पाल यांना मारण्यापूर्वी त्यांच्या घरी गेला होता. त्याने उमेश पाल यांचे अतिक अहमदशी फोनवर बोलणे करून दिले होते. अतीकने उमेश पाल यांना फोनवर धमकी दिली होती, त्यानंतर उमेश पालने उलट उत्तर दिले होते. त्यानंतरच त्यांच्या हत्येचा कट रचला गेला. अतीक अहमदचे वकील खान सुलत हनिफ यांनी कोठडी दरम्यान ही माहिती पोलिसांना दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पालने अतिक अहमदशी फोनवर बोलत असताना त्याचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला होता. त्यानंतर अतीक अहमदच्या सांगण्यावरून मुलगा असदने शूटर्स आणि अश्रफ अहमद यांच्या मदतीने कट रचून हत्या घडवून आणली.

अतिक अहमदच्या वकिलांनी केला खुलासा : अतिक अहमदचा सर्वात महत्त्वाचा वकील खान सुलत हनिफ याने 12 तासांच्या कोठडीत पोलिसांना अनेक धक्कादायक रहस्ये सांगितली. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पाल अपहरण प्रकरणाचा निकाल येण्यापूर्वी अतिक अहमद याने उमेशला फोन करून खटला मागे घेण्यासाठी किंवा साक्ष देण्यापासून दूर जाण्यासाठी किंवा तडजोड करण्यासाठी दबाव टाकला होता. तसेच असे न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. मात्र उमेश पाल मागे हटले नाही. यानंतर अतिक अहमदने त्याचा सर्वात महत्त्वाचा बॉम्बर गुड्डू मुस्लिम याला उमेश पाल यांच्या घरी पाठवले. गुड्डूने अतिकला उमेश पाल यांच्याशी मोबाईलवरून बोलायला लावले होते. अतिकच्या या शेवटच्या धमकीनंतरही उमेश पाल घाबरले नाही आणि उलट उत्तर दिले. त्यानंतर अतिकच्या सांगण्यावरून असद आणि अशरफ यांनी शूटर्सना एकत्र करून हत्येचे संपूर्ण नियोजन केले.

रेकी करून केली हत्या : अतिकच्या सांगण्यावरून त्याचा मुलगा असद गुड्डू मुस्लिम, गुलाम, अरमान, उस्मान यांच्यासह 9 जणांना घेऊन बरेली जेलमध्ये अशरफला भेटायला गेला. बरेली जेलमध्येच सर्व सेटिंग करण्यात आली होती. 12 फेब्रुवारी रोजी बरेलीहून शहरात परतलेल्या शूटर्सनी कट रचण्याचे काम सुरू केले. असदने या योजनेचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली आणि शूटर्ससोबत उमेश पालच्या हत्येसाठी कोर्ट ते घरापर्यंत रेकीही केली. आधी 21 फेब्रुवारीला खून करण्याचा बेत होता, मात्र त्याचवेळी पोलिसांचे वाहन आल्याने अखेरच्या क्षणी सर्वांना थांबावे लागले. यानंतर पुन्हा 24 फेब्रुवारीला या सर्वांनी उमेश पाल आणि त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन हवालदारांची हत्या केली.

हेही वाचा :

  1. Wrestlers Protest : शेतकऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम, 11 मे पर्यंत न्याय मिळाला नाही तर..
  2. Ashok Gehlol on PM Modi: धार्मिक वक्तव्ये केल्याने पंतप्रधान मोदींच्या सभेवर बंदी घालावी- अशोक गेहलोत यांची मागणी
  3. Wresters Protest : शेतकरी संघटनांचाही जंतरमंतरवरील पैलवानांना पाठिंबा, राजधानीत होणार कडक सुरक्षा व्यवस्था

ABOUT THE AUTHOR

...view details