प्रयागराज : उमेश पाल हत्याकांडाने देशभरात खळबळ उडाली होती. उमेश पाल हत्याकांडातील शूटरचे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या हाती लागले आहे. उमेश पालची हत्या करण्यापूर्वी 13 दिवस अगोदरचे हे फुटेज असल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले आहे. उमेश पाल हत्याकांडाच्या अगोदर अतिक अहमदचा मुलगा असदसोबत उमेश पाल हत्याकांडातील सगळे शूटर्स या फुटेजमध्ये दिसत आहेत. हे सगळे शूटर्स अश्रफला भेटण्यासाठी कारागृहात गेले होते, त्यावेळी कारागृहाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे शूटर्स कैद झाले आहेत.
कारागृहातील सीसीटीव्हीत कैद झालेले शूटर्स कारागृहात शूटर्स गेले बॅगा घेऊन :कारागृहातील बंदीवानांना भेटण्यासाठी नातेवाईक रिकाम्या हाताने जातात. मात्र अश्रफला भेटण्यासाठी बरेलीच्या कारागृहात गेलेल्या या शूटर्सच्या हातात बॅग होत्या. हे चारही जण वेगवेगळ्या बॅग घेऊन कारागृहात गेले होते. यावेळी कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे चारही जण कैद झाले आहेत.
बरेली कारागृहातील सीसीटीव्हीत शूटर्स कैद :उमेश पाल खून प्रकरणापूर्वीचा सगळे शूटर्स बरेली कारागृहात गेले होते. यामध्ये एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला अतिक अहमदचा मुलगा असदसोबतच शूटर्स गुलामही यामध्ये दिसत आहे. या दोघांशिवाय शूटर्स विजय चौधरी उर्फ उस्मान आणि ड्रायव्हर अरबाज हे देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. याशिवाय उमेश पाल हत्येप्रकरणी गुड्डू आणि अरमानसह अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणारा सदाकतही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
अशरफला भेटण्यासाठी गेले होते ९ जण :बरेली कारागृहात 11 फेब्रुवारीला हे सगळे शूटर्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. बरेली तुरुंगात बंद असलेला अतिक अहमदचा धाकटा भाऊ अश्रफला भेटण्यासाठी ९ जण गेले होते. उमेश पालची हत्या करणार्या सर्व शूटर्सची अश्रफने बैठक घेतली होती. संपूर्ण घटना कशी घडवायची याचा आराखडा आखल्याचे सांगितले जात आहे. अतिक टोळीची दहशत करण्यासाठी हे सारे घडवण्यात आल्याचे बोलले जात आहे. अश्रफची भेट घेतल्यानंतर असदही सर्व शूटर्ससह प्रयागराजला परतला होता. 11 फेब्रुवारीला केलेल्या नियोजनानुसार बाजाराच्या मध्यभागी उमेश पालच्या घराबाहेर भरदिवसा त्यांची हत्या करण्यात आली. त्यासोबतच उमेश पाल यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन्ही पोलिसांचाही मृत्यू झाला.
हेही वाचा - Suspicious Death of Student: तोंडात फटाका फुटल्याने विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू