झाशी (उत्तरप्रदेश):उमेश पाल हत्येप्रकरणी आरोपी माफिया अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद आणि त्याचा एक साथीदार झाशी येथे यूपी एसटीएफ टीमसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. असद आणि त्याचा साथीदार गुलाम मकसूदन हे दोघे ठार झाले असून, त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. झाशी येथे डीवायएसपी नवेंदू आणि डीवायएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपीएसटीएफ टीमसोबत झालेल्या चकमकीत हे दोघे मारले गेले. विदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहेत.
पाच पाच लाखांचे होते बक्षीस:उमेश पाल हत्येप्रकरणी मोठा अपडेट समोर आला आहे. माफिया अतिक अहमदचा मुलगा असद याचे पोलिसांनी एन्काउंटर केले आहे. याशिवाय गुलामचीही पोलिसांनी हत्या केली आहे. उमेश पाल खून प्रकरणात दोघांचा सहभाग होता. दोघांवर पाच-पाच लाखांचे बक्षीस होते. माफियातून राजकारणी झालेले अतिक अहमद यांचा मुलगा असद आणि गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल खून प्रकरणात वॉन्टेड होते. प्रत्येकावर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. झाशीमध्ये डीएसपी नवेंदू आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपी एसटीएफ टीमसोबत दोघांची चकमक झाली. दोघेही त्यात ठार झाले आहेत.