बरेली (उत्तर प्रदेश) : उमेश पाल खून प्रकरणात शनिवारी प्रयागराज पोलीस माफिया अतिक अहमदचा भाऊ अशरफ याला प्रयागराजला घेऊन जाऊ शकतात. तो सध्या बरेली जिल्हा कारागृहात बंद आहे. प्रयागराज सीजीएम कोर्टातून अशरफविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे. अशरफला जिल्हा कारागृहातून नेण्यापूर्वी अशरफची बहीण, पत्नी आणि मेहुणीसह त्याच्या वकिलांचे पथक कारागृहात पोहोचले आहे. ते अशरफच्या ताफ्यासह प्रयागराजला जातील. अशरफच्या बहिणीने चकमकीची भीती व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
पोलिसांचे पथक बरेलीला पोहोचले : माफिया अतिक अहमदचा भाऊ अशरफ हा गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा कारागृहात बंद आहे. काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडातही अशरफचे नाव पुढे आले होते. यानंतर त्याला प्रयागराजला आणण्याच्या हालचालींना वेग आला होता. प्रयागराजच्या सीजेएम कोर्टातून अशरफविरोधात वॉरंटही जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला हजर करण्यासाठी प्रयागराजहून पोलिसांचे एक पथक बरेलीला पोहोचले असून ते शनिवारी अशरफला जिल्हा कारागृहातून प्रयागराजला घेऊन जाऊ शकतात.