महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Atiq Ahmed In Court : उमेश पाल हत्याकांड प्रकरण, माफिया अतिक आज न्यायालयात होणार हजर

उमेश पाल अपहरण प्रकरणी प्रयागराजच्या एमपी - एमएलए कोर्टात आज निकाल सुनावण्यात येणार आहे. न्यायालयात हजर राहण्यासाठी काल अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ प्रयागराजच्या नैनी मध्यवर्ती कारागृहात पोहोचले आहेत.

Atiq Ahmed
अतिक अहमद

By

Published : Mar 28, 2023, 8:10 AM IST

प्रयागराज : उमेश पाल हत्याकांड प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ हे या प्रकरणात आरोपी आहेत. दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यासाठी अतिकला सोमवारीच गुजरातच्या साबरमती कारागृहातून तर अशरफला बरेली कारागृहातून प्रयागराजला आणण्यात आले आहे.

एकूण 11 आरोपी : 25 जानेवारी 2005 रोजी बसपा आमदार राजू पाल यांची हत्या करण्यात आली होती. उमेश पाल या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. माफिया अतिकने त्याला या प्रकरणातून माघार घेण्यास सांगितले होते. मात्र उमेश पालने त्याचे ऐकले नाही. यानंतर 28 फेब्रुवारी 2006 मध्ये उमेश पालचे अपहरण झाले. त्याला माफियांनुसार साक्ष देण्यास सांगण्यात आले. अतिकचे म्हणणे न ऐकल्याने त्याचा अनेक प्रकारे छळही करण्यात आला. या अपहरण प्रकरणात अकरा जणांना आरोपी करण्यात आले होते.

अतिकचा भाऊही न्यायालयात उपस्थित राहणार : अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ न्यायालयात हजर राहण्यासाठी नैनी मध्यवर्ती कारागृहात पोहोचले आहेत. तर फरहान नावाचा आरोपी आधीच नैनी मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. त्याचवेळी, अतिकचे वकील खान सुलत हनिफ आणि इतर आरोपी जामिनावर बाहेर आहेत. याशिवाय अन्सार नावाच्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी न्यायालयात अतिक आणि अशरफसोबत फरहानही उपस्थित राहणार आहे.

अतिक नैनी सेंट्रल जेलमध्ये बंद :सोमवारी अतिक अहमदसह कुटुंबातील 3 सदस्यांनी प्रयागराजच्या नैनी सेंट्रल जेलमध्ये रात्र काढली. अतिकचा धाकटा भाऊ व माजी आमदार खालिद अझीम उर्फ ​​अशरफ याला बरेली तुरुंगातून नैनी मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले आहे. तर अतिक अहमद याचा दुसरा मुलगा अली अहमद अनेक महिन्यांपासून नैनी मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. अतिक अहमदसह तिघांनाही स्वतंत्र बराकीत ठेवण्यात आले आहे. उमेश पाल खून प्रकरणानंतर एक महिना आणि तीन दिवसांनी अतिक आणि अशरफ यांना प्रयागराज येथे आणण्यात आले आहे. यापूर्वी राजू पाल खून प्रकरणानंतर अतिक अहमद आणि अशरफ काही काळ नैनी मध्यवर्ती कारागृहात राहिले होते.

हेही वाचा :Firing In Jamshedpur Court: जमशेदपुरमध्ये न्यायालयाच्या परिसरात गोळीबार! गुन्हेगारांचे पोलिसांना खुले आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details