नवी दिल्ली -उमर खालिदला त्याच्या बहिणीच्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा जामीन सशर्त असून न्यायालयाने उमर खालिदला 30 डिसेंबरला पुन्हा हजर होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. उमरला हा 23 डिसेंबरपासून आठवडाभरासाठी जामीन मिळाला आहे.
खालिद सैफीचीही निर्दोष मुक्तता - दरम्यान, शनिवार (दि .3 डिसेंबर)रोजी दिल्लीच्या करकरडूमा न्यायालयाने 2020 ईशान्य दिल्ली दंगलीतील दगडफेकीच्या प्रकरणात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात आणखी एक विद्यार्थी नेता खालिद सैफीचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. वरिष्ठ वकील त्रिदीप पाइस यांनी खालिची बाजू मांडली आणि दिल्ली पोलिसातर्फे सरकारी वकील अमित प्रसाद होते.
वडील एका राजकीय पक्षाचे नेतृत्व करतात - खालिद त्याच्या सुटकेच्या काळात सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवू शकतो. त्यामुळे समाजात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. असे कारण देत खालिदच्या जामीन अर्जाल दिल्ली पोलिसांनी विरोध दर्शवला होता. तसेच, दिल्ली पोलिसांनी दावा केला होता की, खालिदचे आई-वडील सर्व आवश्यक व्यवस्था करण्यास सक्षम आहेत. कारण त्याची एक बुटीक चालवते आणि त्याचे वडील एका राजकीय पक्षाचे नेतृत्व करत आहेत असही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.
निदर्शनांमध्ये खालिदचे नाव - खालिद सप्टेंबर 2020 पासून तुरुंगात आहे. 18 ऑक्टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांच्या खंडपीठाने खालिदला जामिनावर सोडण्यास नकार दिला. दंगल सुरू होण्यापूर्वी झालेल्या निदर्शनांमध्ये खालिदचे नाव पुढे आले होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की खालिद हा व्हॉट्सअप ग्रुप डीपीएसजी आणि जेएनयूच्या मुस्लिम विद्यार्थ्यांचा सक्रिय सदस्य होता. दिल्लीतील दंगलीचा संपूर्ण कट रचलेल्या अनेक सभांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असेही न्यायालयाचे मत आहे.