नवी दिल्ली - आम्ही रशियन युद्धनौकेचे हल्ला करून नुकसान केले आहे असा दावा युक्रेनने केला आहे. दरम्यान, मॉस्क्वा युद्धनौकेला आग लागल्याने त्याचे नुकसान झाले आहे, त्यावर युक्रेनकडून कोणताही हल्ला झालेला नाही असा खुलासा रशियाने केला आहे. (Ukraine claims Attack on Russian warship) मॉस्क्वाच्या नुकसानीमुळे रशियन सैनिकांचे खूप नुकसान झाले आहे. तर, दुसरीकडे रशियाने युक्रेनवर सीमावर्ती भागात हवाई हल्ले केल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाबाबत युक्रेनला अधिक गुप्तचर माहिती देण्याचा अमेरिकेवर दबाव आहे.
अनेक निर्बंध लादले जात आहेत - युक्रेन गेल्या 50 दिवसांपासून युद्धाच्या आगीत होरपळत आहे. रशिया सतत जोरदार हल्ला करत आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह जगातील अनेक शक्ती युक्रेनला मदत देण्याचे काम करत आहेत. ही लढाई बराच काळ सुरू आहे. युद्धाचा सूर्य कधी मावळणार, रक्तरंजित खेळ कसा संपणार यावर मंथन सुरू आहे. (Moscow On Russian Troops) मात्र, अद्याप या दिशेने कोणतेही मोठे पाऊल उचलण्यात आलेले नाही. मात्र, रशियाला कमकुवत करण्यासाठी त्यावर अनेक निर्बंध लादले जात आहेत.
निवासी इमारतींवर सहा हवाई हल्ले - युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या रशियाच्या ब्रायन्स्क भागात युक्रेनच्या लष्कराने हवाई हल्ले केल्याचा आरोप रशियन अधिकाऱ्यांनी केला आहे. रशियाच्या तपास समितीने आरोप केला आहे, की दोन युक्रेनियन लष्करी हेलिकॉप्टर गुरुवारी (दि. 14 एप्रिल)रोजी रशियन हवाई हद्दीत घुसले आणि त्यांनी रशियन सीमेपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या क्लिमोवो गावातील निवासी इमारतींवर किमान सहा हवाई हल्ले केले.
अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल - येथील किमान सहा घरांचे नुकसान झाले असून एका अर्भकासह सात जण जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. तत्पूर्वी, रशियाच्या सरकारी सुरक्षा सेवेने गुरुवारी देखील युक्रेनियन सैन्याने ब्रायन्स्क प्रदेशातील सीमा चौकीवर बुधवारी मोर्टार डागल्याचा आरोप केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इशारा दिला की रशियाकडून गॅस आयात कमी करण्याच्या पाश्चात्य प्रयत्नांचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल.