उज्जैन - आतापर्यंत आपण ऐकत आलो आहोत की, केवळ वस्तू व सेवा यावर कर आकारला जातो, परंतु उज्जैनमधील विक्रम विद्यापीठ परिसरात श्वास घेण्यावरही कर लावण्यात आला आहे. टॅक्सच्या रूपात विद्यार्थी व परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या अन्य लोकांना केवळ एक रोपटे लावावे लागणार आहे. या रोपाची देखभालही याच लोकांना करावी लागणार आहे. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना प्रत्येक महिन्याला रोपट्यासोबत सेल्फी घ्यावी लागणार आहे. याच आधारावर विद्यार्थ्यांना प्रोजेक्टचे अंक देण्यात येतील.
विक्रमविद्यापीठात ऑक्सिजन टॅक्स -
कुलगुरू अखिलेश कुमार यांनी सांगितले, की विक्रम विद्यापीठाच्या 300 एकर कॅम्पसमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यांनी म्हटले की, वृक्षारोपणचे महत्व आपल्याला जाणून घ्यावे लागणार आहे. एक व्यक्ती एक मिनिटमध्ये 7 ते 8 लिटर वायू श्वासामार्फत घेतो, त्यामध्ये २० टक्के ऑक्सिजन असतो. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती प्रतिदिन 550 लिटर वायू घेतो आणि एक वृक्ष दिवसभरात 750 लिटर ऑक्सिजनची निर्मिती करतो. त्याचबरोबर विद्यापीठ परिसरात प्रत्येक दिवशी चार ते पाच हजार लोक सकाळ-संध्याकाळी फिरण्यासाठी येतात. या लोकांना टॅक्सच्या रूपात कॅम्पसमध्ये रोप लावावे लागणार आहे.